News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - शहरातून किंवा ग्रामीण भागातून मोटरसायकली चोरायच्या आणि त्यांची जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर विक्री करायची असा उद्योग करणाऱ्या दोघांना सिंदेवाही पोलिसांनी परिश्रम घेऊन अटक केली आहे. Bike theft
पोलीस स्टेशन सिंदेवाही अप क्रमांक 144 / 0 22 कलम 379, 34 भादवि तपासा सह गुन्ह्यात आरोपी नामे (१)सचिन उर्फ बादशाह नगराळे राहणार राजुरा,(२) अलमस्त फारूक कुरेशी वय 22 वर्ष राहणार वडसा यांना ताब्यात घेऊन सिंदेवाही ठाणेदार घारे यांचे मार्गदर्शनात ASI ढोके तपास करीत आहेत. आरोपी कडून चोरी गेलेले मोटर सायकल क्रमांक
MH-34 AU-03 91 असा असून त्यांच्या ताब्यातील या क्रमांकाचे गाडी मिळाली आहे.
पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.
