चंद्रपूर - मागील अनेक वर्षांपासून न सुटलेला प्रश्न म्हणजे चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी, मुख्य मार्गावरील शहराच्या बाहेर जाण्यासाठी नागरिकांना एकमेव मार्ग म्हणजे ऐतिहासिक जटपुरा गेट, मात्र या गेटमधून बाहेर निघण्यासाठी नागरिकांना खूप मोठी कसरत करावी लागते.
वाहतूक कोंडी झाल्यावर सदर परिसरात ध्वनी प्रदूषण, वाहनातून निघणाऱ्या धुरीचे जीवघेणे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करीत आहे, मात्र सदर वाहतूक कोंडीचा प्रश्न काही सुटलेला नाही.
ही वाहतूक कोंडी सुटावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना, जनप्रतिनिधी यांनी पुढाकार सुद्धा घेतला मात्र सर्व यावर केलेलं सर्व प्रयोग फसले. Chandrapur traffic police
वाहतूक कोंडी जशीच्या तशीच राहली, अर्थमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिक व सामाजिक संघटनाना एकत्र करीत बैठक घेत यावर काही उपाययोजना करण्याचे सुचविले, त्यानंतर पोलीस प्रशासनाने अनेक प्रयोग केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. Social experiment
मध्यंतरी जटपुरा गेटमधील खिडकी तोडून त्यामधून वाहतूक सोडण्यात यावी अशी चर्चा सुरु झाली मात्र पुरातन विभाग व काही संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता. Traffic problem
मात्र आता आमदार किशोर जोरगेवार व चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने पुढाकार घेतला असून वाहतूक विभागाने दुचाकी वाहनासाठी मार्ग बद्लविला.
वाहतूक पोलीस निरीक्षक पाटील यांनी सदर प्रयोग केला असला तरी त्यामागे राजकीय व सामाजिक संघटनांचा ही दबाव आहे. Jatpura gate
सदर प्रयोग का आठवडाभर चालणार असून जर वाहतूक कोंडी कमी झाली तर हा प्रयोग कायम राहणार अशी त्यांनी माहिती दिली. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे जेणेकरून वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल.
आता हा प्रश्न सुटणार की तसाच राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.