News 34 chandrapur
चंद्रपूर - 30 वर्षीय घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवीत 26 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार करण्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. Sexually abuse30 वर्षीय घटस्फोटीत महिला वर्ष 2020 ला नवऱ्यापासून विभक्त झाली त्यानंतर ती महिला इंदिरानगर येथे आई-वडिलांच्या घरी राहायला गेली होती.
त्यावेळी त्याच परिसरात राहणारा विशाल विश्वजित पोद्दार नामक युवकाशी त्या महिलेसोबत ओळख झाली, सदर ओळख ही प्रेम संबंधात रूपांतरित झाली, त्या युवकाने सदर महिलेसोबत अनेकदा शरीर संबंध प्रस्थापित केले होते.
यातूनच महिलेला तब्बल 2 वेळा गर्भधारणा झाली, मात्र सध्या बाळ नको म्हणत त्या युवकाने लग्नांनंतर बाळ ठेवू असे सांगत त्या महिलेचा गर्भपात केला.
महिला नेहमी लग्नाची गोष्ट विचारत असल्याने त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली, काही दिवसांनी सदर युवकाने आपण बाहेरगावी रूम करून राहू असे सांगत त्या महिलेला नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथील चांदगाव ला रहायला गेला.
मात्र 2 महिन्यांनी परीक्षा आहे म्हणत तो युवक त्याठिकानाहून निघून घरी आला, आई वडिलांची लग्नाला नामंजूरी असल्याने महिलाही घरी परत आली.
महिलेने काही दिवसांनी विशाल सोबत सम्पर्क साधला मात्र त्याने सरळ माझा व तुझा काही संबंध नाही व मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगत तिच्यासोबत बोलणे बंद करीत मोबाईल बंद केला.
घटस्फोटीत पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवीत वारंवार अत्याचार केला असल्याची बाब जेव्हा महिलेला समजली त्यावेळी महिलेने याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये 19 जून ला तक्रार दिली.
मात्र पोलिसांनी आरोपी विशाल ला अद्यापही अटक केली नाही, आरोपी विशाल ला तात्काळ अटक करावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सरिता मालू यांनी पीडित महिलेला सोबत घेत आरोपीला अटक व्हावी अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिला. Abortion
आरोपी विशाल ने सदर महिलेचा शारीरिक फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला, व तिचा जबरी गर्भपात केला हा गंभीर गुन्हा असून त्याला पोलीस विभागाने तात्काळ अटक करावी अशी मागणी मालू यांनी केली आहे.