News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे जिल्ह्यातील ड्रीम टाऊन राहुल रेड्डी फिल्म स्टुडिओ यांच्या माध्यमातून Rising Star Of Maharashtra नामक स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमात राज्यभरातून 70 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची अंतिम फेरी पुण्यातील तळेगाव येथे संपन्न झाली. लहान ते प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सदर स्पर्धा आयोजित केली होती.
नृत्य ते सौंदर्य स्पर्धा ही यावेळी घेण्यात आली.
29 मे ला झालेल्या अंतिम फेरीत लहान मुलांपासून प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. RisingStars
मिसेस Rising Star Of Maharashtra कॅटेगरी मधून चंद्रपूरच्या सीमा मेश्राम यांनी प्रथम क्रमांक पटकावीत स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या.
स्पर्धेतील विजेत्या सीमा मेश्राम ह्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहे, त्यांच्या यशाबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
