News 34 chandrapur
चंद्रपूर - महावितरण चंद्रपूर परिमंडळात दि. ०६ जून २०२२ रोजी महावितरणचा १७ वा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी धकाधकीचे कामात व्यस्त् असणाऱ्या महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांना उपलब्ध करून देण्यात आली. स्थानिक वनप्रबोधिनीच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित या वर्धापण दिन कार्यक्रमाचे सायंकाळी ६ वा. मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन दिपप्रज्वलांने पार पडले. कार्यक्रमांची सुरुवात उन्ह ,वारा, पाउुस ,वादळ अशा विपिध विपरीत परिस्थितींना तोंड देत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समर्पित ध्वनीचित्र फित यावेळी सादर करण्यात आली. Msedcl 17th Anniversary
हा कार्यक्रम आयेाजित करण्याचे- ध्येय हे अतिशय तणावपुर्ण परिस्थितीत न डगमगता धैर्याने ऊन, वारा, पाऊस, वादळात ग्राहकांना सेवा देणाऱ्या महावितरणच्या कर्मचारी यांना विरंगुळयाचे व आनंदाचे काही क्षण उपलब्ध् करून देणे व त्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अविरत केलेल्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे होते. Msedcl online कर्मचाऱ्यांसाठी दिवसभर विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम व खेळांचे आयोजन करण्यात आले. महावितरण कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आयोजित नृत्य व गायन स्पर्धेत बालगोपाळांनी मनमुराद आनेद लुटला. पुरूष व महिलांचे क्रिकेटचे सामने स्थानिक एमईएल च्या सहकार्याने एमईएल च्या पटांगणात व घेण्यात आलेल्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये मुख्य अभियंता व व अधिक्षक अभियंता यांच्या पासुन कनिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी हिरीरींने भाग घेतला. स्पर्धेत विजयी चमूंना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमांतून कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा लाभण्यास कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी नृत्य, गायन व स्नेहमिलनांअंतर्गत स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. याच दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर परिमंडळ कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांसाठी नविन उपहारगृह सुरु करण्यात येवून ते कर्मचाऱ्यांना समर्पित करण्यात आले. Mseb
सर्वप्रथम मुख्य अभियंता यांनी सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांना १७ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना काळाच्या कटू काळात ग्राहकांना अविरत वीजपुरवठा करण्यास धडपड करणाऱ्यांना व प्रसंगी आपले प्राण गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. महावितरण चंद्रपूर परिमंडळ हे सकारात्म्क दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले. गेल्या काही वर्षात महावितरणव्दारा वसूली, विजयंत्रणा सक्षमीकरण, नविन कृषी ऊर्जा धोरणात करण्यात आलेली वसूली किंबहूना कृषीपंप धारकांना थकबाकीमुक्त् करण्याचे यश ग्राहकसेवा पार पाडण्याचे अखंड अविरत विपरीत परिस्थितीत पार पाडण्यात आलेले यश यांवर प्रकाश टाकत त्यांनी कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमातून सकारात्मकतेची ऊर्जा घेत नविन जोमाने काम करून ग्राहकांप्रती समर्पित सेवा देण्याचे व्रत पार पाडण्याचे आवाहन केले. Mahavitaran
संपूर्णपणे कौटुंबिक असलेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या कर्मचारी वर्गाने आनंदाची शिदोरी सोबत नेली. या कार्यक्रमांच्या आयोज नासाठी वर्धापणदिन आयोजन समितीने मोलाची कामगिरी बजावत कार्यक्रम यशस्वी होण्यास विशेष प्रयत्न केले.

