News 34 chandrapur
चंद्रपूर - घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेता राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीने आपआपल्या गोट्यातील आमदारांना मुंबई येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये बंदिस्त केले आहे. एकप्रकारे त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. यात अपक्ष आमदारांकडे विशेष लक्ष ठेवल्या जात आहे. मात्र अशातही चंद्रपूर मतदार संघातील अपक्ष आमदार हॉटेलमध्ये नाही तर मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटी घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी विविध विभागाच्या पाच मंत्र्यांची भेट घेतली असून मतदार संघातील विविध महत्वाच्या प्रश्नांकडे मंत्री महोद्यांचे लक्ष वेधले आहे. Rajya Sabha elections
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रथेला यावेळी बगल देत भाजप आणि शिवसेनेने उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. अधिकाधिक संख्येने अपक्ष आमदारांना आपल्या बाजुने ओढण्याचा प्रयत्न दोनीही पक्षांकडून केल्या जात आहे. Independent MLA अशात मोठ्या प्रमाणात धोडेबाजाराची शक्यता दोनही पक्षांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा संभावित धोका टाळण्यासाठी दोन्हीही पक्षांनी आपआपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. हॉटेलमध्ये घडत असलेल्या घडामोंडीवर सदर पक्षातील वरिष्ठ नेते लक्ष ठेऊन आहे. मात्र अशातही चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवारयांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा मतदार संघातील प्रश्नांसाठी मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्याला अधिक महत्व दिले आहे. त्यामुळे सर्व आमदार हॉटेलमध्ये नजरकैदेत असतांना अपक्ष आमदार मंत्रालयात कसे काय हा विषय चर्चेचा ठरला आहे.
Mla kishor jorgewar
आज त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली या भेटीत त्यांनी वर्धा नदीवरील धानोरा बॅरेजची तात्काळ निर्मिती करण्यासदंर्भात चर्चा केली हा विषय मार्गी लावण्यासाठी बैठक लावण्याची विनंतीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. जयंत पाटील यांना केली. यावर लवकर बैठक लावण्याचे निर्देश जयंती पाटील यांनी संबधित विभागाला दिले आहे .
चंद्रपूर जिल्हा क्रिडा संकुलच्या विकासासाठी 20 कोटी रुपये निधी देण्यात यावा, मा. सा. कन्नमवार बॅटमिंटन कोर्टसाठी ५ कोटी रुपये निधीदेण्यात यावे, विसापूर येथील क्रिडा संकुलाच्या विकासासाठी अतिरिक्त 9 कोटी रुपये देण्यात यावे तसेच घुग्घूस येथे क्रिडा संकुलची निर्मिती करण्यात यावी या मागणीसाठी आ. जोरगेवार यांनी क्रिडामंत्री सुनिल केदार यांची भेट घेतली. यावेळी सदर सर्व विषयांसदर्भात बैठक लावण्याचे निर्देश ना. सुनिल केदार यांनी दिले आहे. शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक लावण्यात यावी तसेच मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 37 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात यावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी ना. अशोक चव्हाण यांच्या सोबत आमदार किशोर जोरगेवार यांची सकारात्मक चर्चा झाली असुन सदर मागणी संदर्भात बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी संबधित विभागाला दिले आहे. चंद्रपूर शहरात प्रदुषनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांचीही आज मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली आहे. यावेळी चंद्रपूरातील वाढत्या प्रदुषणाकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. संजय बनसोडे यांचे लक्ष वेधले. यावर तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात लवकरच बैठक लावण्यात येईल असे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले आहे. शिवभोजनची संख्या वाढविण्यात यावी, सुरु असलेल्या शिवभोजन केंद्राची नियमीत तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली आहे. याबाबतही मुंबई येथे लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. एकंदरीत पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व महत्वाच्या विभागातील मंत्र्यांची भेट घेत मतदार संघातील प्रमुख्य प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
