News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव-लौनखैरी येथील 65 वर्षीय इसमाने लोनखैरी (तूकुम) येथील शेतशिवारातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.१४/६/२०२२ ला मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
मृतक नाव श्रीधर श्रीरामे वय- 65
नवेगाव - लोनखैरी तालुका सिंदेवाही असे असुन
मृतक श्रीधर श्रीरामे याच्या आठ दिवसापासून मानसिक स्थिती बरी नव्हती. हा वेड लागल्या गत बोलत होता आज सकाळी ८ वाजता
खरॉ खाऊन येतो असे म्हणून घरून निघून गेला तर घरी परत आलाच नाही घरातील लोकांनी गावातील परिसरामध्ये शोधाशोध केली असता तो लोणखैरी (तुकुम) येथील बगडे यांच्या शेतशिवारातील विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दिसले अशी माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाचे शव सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्याकरता आणले असून पोलिसांनी मर्ग क्रमांक -22 नोंद केला असून सिंदेवाही ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास ASI बळीराम गेडाम यांनी केला असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
