News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - मुल येथे योगदिनाचे महत्त्व सांगण्यासाठी क्रिडा संकूल येथून दि. 20 जूनला प्रभातफेरी काढण्यात आली तर आंतरराष्ट्रीय योगदिन 21जूनला महर्षि पंतजली योग भवन येथे भारतीय जनता पार्टी, वात्सल्य योग बचत गट, व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा मूल च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांच्या नेतृत्वात व योगगुरू अनिल गांगरेडीवार, गणेश मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 5:30 वाजता योगाचे आयोजन करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष प्रा रत्नमाला भोयर यांच्या विशेष उपस्थितीत बहुसंख्य नागरिक, योगसाधक योगासाठी सहभागी झाले. यामधे सुखदेव चौथाले, दिलीप पोकळे, चेतानंद कवाडकर, कल्पना मेश्राम, वंदना वाकडे, प्रभा चौथाले, अर्चना चावरे, मीरा शेंडे, मिनाक्षी छोंकर, माधुरी करकाडे, ललिता मुस्कावार, मुत्यालवार ताई, अनुष्री रेड्डीवार, सौ. ठीकरे, शशिकला गावतुरे, रेखा पोकळे, कविता मोहुर्ले, रजनी कोतकोंडवार, बटे गुरुजी, यांचेसह योग समितीचे सर्व सदश, पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे जिल्हा संघतीका,तालुका संघटीका व महिला पुरुष उपस्थित होते.

