News 34 chandrapur
चंद्रपूर - पावसाळा आला की घाटावरील रेती उपसा थांबतो, पण बांधकामासाठी वाळू आणायची कुठून असा पेच निर्माण होतो.ज्या ठिकाणी रेती घाटाचे लिलाव झाले नाही त्याठिकाणी मात्र वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करीत अनेक ठिकाणी रेती स्टॉक करून ठेवत आहे. Sand mafia
मात्र स्टॉक केलेली रेती ही छुप्या जागेवर नसून रस्त्यावर, मैदानात केल्या जात आहे जेणेकरून या रेतीवर कुणाचे लक्ष जाणार नाही.
बाबूपेठ येथील बंद अवस्थेत असलेल्या पोलीस चौकीच्या मागे चक्क रस्त्यावर रेती साठवून ठेवण्यात आली आहे. Smuggling
हा प्रकार पहिल्यांदाच घडला असे नाही ही दुसरी वेळ आहे, रात्रीच्या सुमारास सदर वाळू उचलल्या जाते व दिवसा वाळूची साठवणूक केल्या जात आहे.
मात्र प्रशासनाचे यावर पूर्णतः दुर्लक्ष होत असून माफियांवर कारवाई करण्याचे धाडस कुणी दाखवीत नाही आहे. Revenue department
शहरातील जमनजट्टी भागात अनेक वर्षांपासून मोठया प्रमाणात वाळूचा अवैध उपसा होत आहे, इराई नदीच्या पात्रात वाळू माफिया दररोज अवैध वाळूची तस्करी करीत आहे, काही महिन्यांपूर्वी अवैध वाळू उपसा करताना एका मजुरांचा वाळू खाली दबून मृत्यू झाला होता मात्र त्यावर महसूल प्रशासनाने काही कारवाई केली नाही.
काही दिवसांपूर्वी वेकोलीच्या उपक्षेत्र अधिकाऱ्याने गौण खनिज करणारे ट्रॅक्टर पकडले व त्यासोबत वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर ही पकडले मात्र त्यावेळी सुद्धा महसूल प्रशासन काही जागा झाला नाही.
पठाणपुरा गेट च्या बाहेर, दुर्गापूर या ठिकाणी मोठया प्रमाणात वाळूचा उपसा केल्या जातो मात्र कारवाई कधी केल्या जात नाही.
आता पावसाळा लागण्याआधी वाळू चा उपसा करीत विविध ठिकाणी साठवणूक करण्याचे काम वाळू माफिया करीत आहे.
महसूल प्रशासनाने या माफियांवर कारवाई करावी जेणेकरून असले प्रकार घडणार नाही.

