News 34 chandrapur
चंद्रपूर - वर्ष 2015 मध्ये चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आला होता, मात्र त्यानंतर जिल्ह्यात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
तब्बल 7 वर्षांनी दारूबंदी उठल्यावर सुद्धा आजही ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे, आता थेट महिलांनी या अवैध दारूविरोधात एल्गार पुकारून प्रशासनावर धडक दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासुन राजुराचे ग्रामीण भागात दारूचा महापुर वाहत असुन राजूरा आणि सास्ती पोलीस याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यांचे आशिर्वादानेच अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. Alcohol addiction
निर्ली,धिडशी आणि चार्ली व परीसरात गेल्या अनेक वर्षांपासुन अवैध दारू विक्रेते सक्रीय आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी होऊनही पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नसल्याने या विक्रेत्यांची हिंमत वाढलेली आहे. गावा गावांत दारूमुळे वातारवरण कलुषीत झालेले असुन लहान मुले देखील दारूचे आहारी जात आहेत. घरा घरांत भांडणे होऊ लागली आहेत. कर्ता पुरूष दिवसभर दारूत आकंठ बुडून असल्याने संसार कसा चालवायचा याची चिंता महिलांना पडू लागला आहे. Illegal sale of alcohol
कुणाचा मुलगा तर कुणाचा पती व्यसनाधीन झालेला आहे. या पार्श्वभूमीवर निर्ली येथील महिलांनी एकत्र येत थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन त्यांचे पुढे आपली कैफीयत मांडली व अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी काॅंग्रेसचे उमाकांत धांडे, उपसरपंच सचिन धांडे, मनिषा गाणफाडे,अनिता धोबे, अल्का वनकर, व्दारका जुमनाके,गिता धांडे, पुनम जुमनाके,सोनाली वेल्हेकर,ममता उमरे, पुजा दुबे, वैषाली जुमनाके,आवळता दुबे,सुलभ भगत, पल्लवी उमरे, सविता धांडे, आकाश धांडे, केतन धांडे, प्रदीप दुबे,भालचंद्र धांडे यांची उपस्थिती होती.

