News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका वर्ष 2019 ला पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही, शिवसेनेने भाजप बरोबर असलेली 25 वर्षांची युती तोडली.मात्र निवडणुकीपूर्वी भाजप व सेना युतीत लढले असल्याने जनतेनी त्यांना बहुमत दिले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी युती धर्माला फाटा फोडत महाविकास आघाडीची स्थापना केली.
राष्ट्रवादी कांग्रेसचे सुप्रीमो शरद पवार व कांग्रेस सोबत शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना करीत राज्यात सत्ता काबीज करीत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. Political news
मात्र सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत पक्षातील आमदार फुटले, निवडणुका संपताच शिवसेनेचे निष्ठावन्त एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत 40 आमदारसाहित गुजरात गाठले.
सध्या महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे, राज्याच्या या राजकीय वातावरणावर चंद्रपूरचे वरिष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रशांत विघ्नेश्वर यांनी आपली बेधडक प्रतिक्रिया News34 ला दिली आहे. Shivsena news
शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडत हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या एकाही निष्ठावंत कार्यकर्त्यांवर विश्वास दाखविला नाही व स्वतः मुख्यमंत्री बनले. Eknath shinde shivsena
स्व. बाळासाहेब ठाकरे हे किंगमेकर म्हणून आयुष्य जगले त्यांनी कधी स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जाहीर केली नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी उलट केले.
शिवसेना महाविकास आघाडीत समाविष्ट झाल्याने पुढील राजकीय भवितव्य काय? यावर ते अज्ञभिज्ञ राहिले.
एकनाथ शिंदे यांचं बंड हे पूर्वनियोजित आहे, उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर आता पुढचा मुख्यमंत्री कोण बनणार? राष्ट्रवादी व कांग्रेसचा मुख्य पदावर डोळा आहे, मात्र शिवसेना तसे काही होऊ देणार नसल्याने तुटलेल्या युतीवर डॅमेज कंट्रोल करण्याचा हा एक डाव आहे.
शिंदे यांच्या बंडावर अनेक आमदार त्यांच्या समर्थनात आहे, शिवसेना हा कट्टर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि एकावेळी 40 आमदार फुटने ही न पटणारी गोष्टचं. BJP Shiv Sena alliance again
जर शिवसेना महाविकास आघाडी सोबत असणार तर मुंबई महानगरपालिका ते कधी वाचवू शकणार नाही, मुंबईचा बालेकिल्ला शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा आहे, त्याला सुरुंग पडू नये यासाठी शिवसेनेने मोठी रणनीती आखली आहे.
शिवसेनेची पुढची खेळी काय?
वरिष्ठ पत्रकार विघ्नेश्वर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की 40 आमदारांचे समर्थन हे भाजपला देत मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्री शिवसेनेचा बनण्याची शक्यता आहे त्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुखाची भूमिका पार पाडतील.
महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यावर अनेकांची भाजपसोबत युती तोडल्याची खदखद मनात होती मात्र पक्षाचा आदेश म्हणून कार्यकर्ते गप्प होते.
नंतर कोरोनाचा भीषण काळ आला त्या काळात कुणी याबाबत बोलण्याची हिंमत केली नाही, मात्र अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर शिवसेना राजकीय भविष्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे.
मात्र मधल्या काळात हनुमान चालीसा व धार्मिक स्थळावरील भोंग्याच्या वादात शिवसेना बंधने घालण्यात अयशस्वी ठरली ज्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा उजाळा मिळाला व शिवसेनेची प्रतिमा धुमीळ न व्हावी यासाठी शिवसेनेने ही रणनीती आखली आहे. Hindutva
सदर तख्तापालट नाट्य लवकर संपणार असून शिवसेना भाजपसोबत पुन्हा युती करीत नवी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांना सादर करणार.
कारण आजही एकनाथ शिंदे बेधडक सांगत आहे आम्ही शिवसेना सोडली नाही, म्हणजे शिंदेचा गट हा शिवसेनेचाचं आहे.
ते वेगळ्या पक्षात जाणार नसून शिवसेनेतच राहून पूर्ण परिस्थिती हाताळणार असल्याची शक्यता आहे.

