ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी वडसा रोडवर पहाटे 3 वाजताच्या दरम्यान भीषण अपघातात 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला तर 3 युवक गंभीर जखमी झाले.
ब्रह्मपुरी वडसा रोडवरील विद्या निकेतन कॉन्व्हेंट जवळ युवक आपल्या चारचाकी वाहन भरधाव वेगात चालवीत असताना त्यांचे वाहनवरील नियंत्रण सुटले असता वाहन झाडाला धडकले. A terrible accident
या धडकेत चारचाकी वाहनाचा चुराडा झाला यामध्ये 24 वर्षीय सनी संजय वाधवानी, 28 वर्षीय शुभम कापगते राहणार वडसा यांचा जागीच मृत्यू झाला.
तर 27 वर्षीय सुमित मोटवाणी, 27 वर्षीय सत्य आहुजा, 27 वर्षीय जोशी हे युवक गंभीर जखमी झाले. Vidya niketan convent