News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल : मुल तालुक्यातील मौजा पडझरी येथे शुक्रवारला वाघाने हल्ला करून युवा शेतकरी प्रमोद मोहुर्ले याला ठार केल्याची घटना घडली. आणि त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले.
कमवता व्यक्ती गेल्याने संपूर्ण कुटुंब निराधार होते. पडझरी येथील शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून असल्याने शेतीत काम करणे भाग पडते. कारण शेतकऱ्यांकडे उत्पंनाचे दुसरे कुठलेही साधन नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील सरपंच, उपसरपंच, परिसरातील गावचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि पडझरी, भादुर्णी येथील असंख्य गावकऱ्यांनी cdcc bank चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तत्काळ घटनासथळी धाव घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी व पंचनामा करण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी यांचेशी शेकडो ग्रांमस्थसमोर सविस्तर चर्चा केली. mahaforest
सरपंच आणि गावकऱ्यांच्या रोष पाहून वरिष्ठ वन अधिकारी त्वरित घटनास्थळी यावे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करावे आणि शासनाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना तसेच यापूर्वी सुद्धा १३ घटना वाघाने ठार केल्याच्या तालुक्यात घडल्या असताना त्यांच्याही कुटुंबीयांना अजूनही आर्थिक मदत मिळालेली नाही. ती देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित शासनाकडून मिळवून द्यावी अशी मागणी केली. तेव्हा उपस्थित शेकडो ग्रामस्थ सुद्धा ही मागणी रेटून धरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आणि जर का मागणी पूर्ण केल्या गेली नाही, तर न्यायालयात सुद्धा जाण्याचा इशारा दिला. तसेच तुमच्या वाघाला त्वरित जेरबंद करण्याची मागणी केली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी वनविभागाच्या रेस्ट हाऊस येथे स्थानिक सरपंच काही ग्रामस्थ यांची मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याची ग्वाही उपवन संरक्षक श्री. गुरुप्रसाद यांनी दिली. Wildlife human conflict
तालुक्यातील अनेक गावे बफरझोन अंतर्गत येतात. त्यामुळे बफरर्क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे वावर आहे. तालुक्यात आतापर्यंत मानव - वन्यप्राणी संघर्षात १४ बळी गेले आहे. परंतु वनविभागाकडून कुठलीही उपाययोजना होताना दिसत नसल्याने संतप्त झालेल्या पडझरी येथील नागरिकांनी चक्क वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याने तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उप वनसंरक्षक श्री. गुरुप्रसाद यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या रेस्ट हाऊस मध्ये सभा घेऊन वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची टीम तैनात केलेली आहे. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, भडूर्णी पडझरी सरपंच रेवता सोनुले, कोसंबी सरपंच रविंद्र किसन कामडी, मारोडा सरपंच भिकारू शेंन्डे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम गुरणुले, अनुराधा प्रमोद नेवारे सरपंच ग्रामपंचायत मोरवाही ,लोकनाथ नर्मलवार,उश्राळा, बंडु भाऊ नर्मलवार सरपंच ग्रामपंचायत उश्राळा, वंदना पेन्दोर सरपंच ग्रामपंचायत काटवन, वर्षा प्रविन आरेकर उपसरपंच,मोरवाही, सुरेश भाऊ फुलझेले,मोहबे, अशोक पुल्लावर मारोडा उपस्थित होते.
