News 34 chandrapur
चंद्रपूर - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात केली, आज मोठ्या प्रमाणात पैश्याचे व्यवहार ऑनलाइन माध्यमांद्वारे होत आहे. Swipe machineउशिरा का होईना आता राज्य परिवहन विभागाने सुद्धा तिकीट विक्री कॅशलेस ची सुरवात करीत आहे.
लालपरी मध्ये आता लवकरच कॅशलेस स्वाईप मशीन उपलब्ध होणार असून याबाबत प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. Upi id
ऑनलाइन पैसे भरा व तिकीट घ्या, प्रवाश्यांची आता चिल्लर पैश्याच्या बाबतीत सुटका होणार आहे.
सध्या चंद्रपूर व गडचिरोली डेपो साठी तब्बल 850 स्वाईप मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. Cashless india
सध्या सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व प्रशिक्षणाची तयारी सुरू असून लवकर ही सेवा प्रवाश्यांना उपलब्ध होणार आहे. Cashless payment
Msrtc bus
Msrtc bus
सध्या ही स्वाईप मशीन मासिक पास देणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे, आता प्रत्येक बस मध्ये स्वाईप मशीन दिल्या जाणार आहे, नागरिक आता गुगल पे, फोन पे द्वारे ऑनलाइन पैसे देत प्रवास करू शकणार आहे.
सध्या चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, अकोला व लातूर या बस विभागाला सर्वात आधी स्वाईप मशीन देण्यात येणार आहे.
बस वाहकाना प्रशिक्षण देण्यासाठी किती दिवस लागेल याबाबत तरी सध्या सांगता येणार नाही मात्र ही सुविधा आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांनी दिली आहे. Online payment
सदर ऑनलाइन सेवेचा लाभ शहरातील नागरिकांसाठी जणू वरदान आहे मात्र ग्रामीण भागातील नागरिक आजही इंटरनेट अभावी जगत आहे, ग्रामीण भागातून हजारो नागरिक लालपरीने प्रवास करीत असतात, स्मार्टफोन पासून ग्रामीण नागरिक आजही दूर आहे मग ते या सुविधेचा कसा घेणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. Google pay, phone pay
शहरी नागरिक खाजगी बस वाहतुकीला प्राधान्य देत आहे, लालपरी चे महत्व वाढावे व कॅशलेस सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी राज्य परिवहन विभागाचा हा प्रयोग कितपत यशस्वी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.