News 34 chandrapur
चंद्रपूर:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नवनियुक्त राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना चंद्रपुरचे प्रसिद्ध डॉ बांबोळे मानसिक रोग तज्ञ चंद्रपुर, प्रा रमेशचंद्र दहिवडे कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षनेते तथा राज्य अध्यक्ष अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स संघटना, बळीराज धोटे ओबीसी मोर्चा - मुख्य समन्वयक, प्रा.सूर्यकांतजी खनके महाअंनिस जिल्हाध्यक्ष चंद्रपूर तथा मुख्याध्यापक व अध्यक्ष मातोश्री विद्यालय चंद्रपुर तसेच अंनिस ऊर्जानगर शाखाचे अध्यक्ष राजा वेमुला, कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर, प्रधान सचिव दुरेंद्र गेडाम व इतर पदाधिकारी तसेच चंद्रपुर शहर शाखेचे अध्यक्ष विनोदराव डफ, जेष्ठ कार्यकर्ते/पदाधिकारी कैलास गर्गेलवार यांचे सोबत प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य व व्याप्ती कशी वाढविता येईल व काय काय कार्यक्रम घेण्यात यावे जेणेकरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम देश विदेशातील जनतेपर्यंत जाईल याचा मागोवा घेऊन चर्चा करण्यात आली.
Superstition Eradication Committee
Superstition Eradication Committee
या संपूर्ण दौऱ्यात कार्याध्यक्ष माधव बावगे यांना चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव, प्रधान सचिव नारायण चव्हाण तसेच चंद्रपुर शहर कार्याध्यक्ष सुनील रत्नाकर भोयर यांनी सहकार्य केले.