News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून इथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घटनेमध्ये वाढ झालेली आहे. शासनाच्या आदेशनव्ये सुगंधित तंबाखू वर्ष 2012 पासून शासनाने प्रतिबंधित केला आहे, मात्र त्यानंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू माफिया सक्रिय आहे. Fragrant tobacco mafia
विशेष म्हणजे ईगल, मजा सारखे सुगंधित तंबाखू चंद्रपुरातच कारखाने थाटून भेसळ करण्यात येत आहे, पोलिसांनी 2 कारखान्यावर धाड टाकली, मात्र संबंधित माफियांवर प्रतिबंधित कारवाई करण्यात आली नाही. सध्या प्रत्येक चौकात सुगंधित तंबाखू युक्त खर्रा खुले आम मिळत आहे मात्र यावर जिल्हा पोलीस प्रशासन सहित अन्न व औषध प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. Oral cancer
अन्न औषध जिल्हा प्रशासना नेहमीप्रमाणे आमच्याकडे पुरेसे मनुष्बळ नाही असे सांगत आपली जबाबदारी पुढे ढकलण्याच काम करीत आहे.
जिल्ह्यात अवैध सुगंधित प्रतिबंधित तंबाखू चा व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याने, युवावर्ग याकडे आकर्षित होऊन यामुळे माऊथ कॅन्सर youth cancer तसेच विविध आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. आजपर्यंत अनेक युवकांनी तोंडाच्या कॅन्सरमुळे आपले प्राण गमविले आहे. साहेबांना परिस्थीती बद्दल अवगत करून विभागातील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देऊन जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यवसाय बंद करण्यात यावा. तसेच सुगंधित प्रतिबंधित तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती निमेश मानकर, जिल्हाध्यक्ष शरद पवार विचार मंच चंद्रपूर यांनी गृहमंत्री यांना केली. Home minister walse patil
गृहमंत्री वळसे पाटील यांनी मानकर यांना सदर तक्रारीबाबत लवकर सर्व सुगंधित माफियाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
