News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल: तालुक्यातील राजोली येथील एका विवाहित युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्रौ ८ वाजताच्या दरम्यान घडली. सुभाष नामदेवराव धारणे वय ४२ वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
Suicide news
Suicide news
सुभाष धारने हे आपले आईवडील १ मुलगा व २ मुली ला घेऊन राजोली येथे मोलमजुरी करून जीवन जगत होता. मात्र शनिवारी तो राजोली येथील माना समाज चौकातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मुल पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. Suicide by jumping into a well
आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.
