News 34 chandrapur
चंद्रपूर - पर्यटनाच्या बाबतीत प्रसिद्ध असलेलं भद्रावती शहर, भद्र नाग मंदिर, जैन मंदिर, गवराळा येथील गणपती मंदीर असे अनेक धार्मिक व सामाजिक बाबतीत भद्रावती शहर प्रसिद्ध आहे. Cancer Brand
मात्र या प्रसिद्ध शहराच्या नावाला बट्टा लावणाऱ्या सुगंधित तंबाखू माफियाने चक्क भद्रावती स्पेशल खर्रा नामक ब्रँड सुरू केले.
भद्रावती नागपूर रोडवर असलेले पान मटेरियल त्याठिकाणी गुटखा व पान मसाला सहज उपलब्ध होते, या पान मटेरियल वर कारवाई सुद्धा झाली मात्र कायदा कठोर नसल्याने सदर प्रकरणातील माफिया सहज बाहेर आला. spreads cancer
यामुळेच गुटखा व सुगंधित तंबाखू माफियांची हिम्मत वाढली आहे. Mouth cancer
भद्रावती येथील पान मटेरियल विक्रेत्याने शहरात व बाहेर गावात सुगंधित तंबाखूचा व्यवसाय करणारे तब्बल 50 ते 60 खर्रा विक्रेत्यांना एकत्र करीत "भद्रावती स्पेशल खर्रा" ब्रँड सुरू करीत याचं जाळ जिल्ह्यात पसरविले.
प्रतिबंधित व भेसळयुक्त सुगंधित तंबाखूचा हा ब्रँड भद्रावती सह संपूर्ण जिल्ह्यात पसरला.
जिल्ह्यातील प्रत्येक गल्ली बोळ्यात "भद्रावती स्पेशल खर्रा" नामक दुकानं सुरू झाले. Oral cancer
पान मटेरियल विक्रेत्याने जणू प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची फ्रेंचायजी देण्यास सुरुवात केली, ईतकेच नव्हे हा खर्रा पोलीस स्टेशनच्या बाजूला सर्रासपणे मिळू लागला. Tobacco free chandrapur
या अवैध धंद्याची उलाढाल ही दररोज लाखो रुपयांच्या वर होऊ लागली, या धंद्यात स्वतः भद्रावती येथील पान मटेरियल विक्रेता सर्व दुकानदारांना खर्रा ला लागणारा सुगंधित तंबाखू पाठवू लागला, व खर्र्यात वापरले जाणारे सुगंधित तंबाखू प्रशासनासमोर खुले आम मिळू लागले.
भद्रावती स्पेशल खर्रा हे नाव जिल्ह्यात प्रसिद्ध झाले, मात्र नेहमी हातावर हात धरून बसत असलेला अन्न व औषध विभाग नेहमीप्रमाणे गप्प राहिला.
नंतर हाच खर्रा नागरिकांमध्ये कॅन्सर सारखा आजार फक्त 20 रुपयात देऊ लागला.
20 रुपयात खर्रा घेत खर्रा शौकीन चौकाचौकात थुंकू लागले, तरीही प्रशासन गप्पच.
सुगंधित तंबाखू माफियांवर कठोर कारवाई कधी होणार? जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला कॅन्सर चा हा खेळ थांबविणार तरी कोण? जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू माफियांचा म्होरक्या वसीम पुन्हा कधी कायद्याच्या चौकटीत फसणार हा मोठा प्रश्न आहे.
