News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील मौजा गांगलवाडी येथील १०/१२ वर्षाच्या मुलांना रोजगार. देऊन गावातील नाल्या स्वछ केल्या जात आहेत. एकीकडे शासन म्हणते की बालमजुरी थांबविण्यात यावी पण ग्रामपंचायत गांगलवाडी येथिल ग्रामसेवक व सरपंच हे या बालमजुरी कायद्याचे उल्लंघन करतांना दिसून येत आहेत. पावसाळ्यात नाली उपसण्याचे काम खूप जोखमीचे व जिम्मेदारीचे असते पण ग्रामपंचायत गांगलवाडी येथिल ग्रामसेवक व सरपंच हे या काम बाल कामगार यांचे कडून करून कायद्याचे पालन न करतांना दिसून येते आहे. Child labor
गांगलवाडीवासी तसेच सामाजिक कार्यकर्ते व सर्व पालकवर्ग यांनी या बालमजुरी कायद्याचे पालन केले पाहिजे आणि बालमजुरी थांबवून आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणी सामाजिक कार्य करणाऱ्या काही ग्रामस्थांनी केली आहे.
