मुंबई - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर येथील बहुजन समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर कारंगल, मा. नगरसेविका श्रीमती राजलक्ष्मी सुधीर कारंगल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काही महिन्यांपूर्वी बसपा चे नगरसेवक प्रदीप डे यांनी बसपाला रामराम करीत कांग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
चंद्रपूर मनपात बसपाचे 8 नगरसेवक निवडून आले होते मात्र कालांतराने बसपा पक्ष शहरात सीमित राहिला.
मात्र आता बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर कारंगल व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका राजलक्ष्मी कारंगल यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश करीत बसपा पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्षा राखीताई जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, निरीक्षक प्रविण कुंठे उपस्थित होते.
