News 34 chandrapur
राजुरा - अलीकडे जोपासल्या जात असलेल्या वैवाहीक कर्मकांडाला फाटा देत राजुरा तालुक्यातील सोनूर्ली येथे समस्त मानव पंचाच्या साक्षीने सत्यशोधक विवाह सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
बल्लारपूर तालुक्यातील पळसगावं येथील सौ. मायाताई श्री सुरेशराव ठाकरे यांचे चिरंजीव सुरज आणि राजुरा तालुक्यातील सोनूर्ली येथील सौ. गोंडीनबाई श्री. तुळशीराम गुरनुले यांची कन्या सोनल ह्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना वंदन करून त्यांनी दिलेल्या विचारांची कास धरून सत्यशोधक पद्धतीने विवाह करून सहजीवनाचा आयुष्याची सुरुवात केली. महापुरुषाच्या प्रतिमेला वंदन व त्यांच्या विचारांचे स्मरण करून सुरज व सोनल यांनी जीवन जगतांना जे काही कडूगोड अनुभव येतील ते सर्व स्विकारून आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. तत्पुर्वी ओबीसी समाजातील पुरोगामी विचाराचे अभ्यासक डॉ. राकेश गावतुरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सत्यशोधक विवाह पध्दतीचे समाजाने अनुकरण करावे, असे आवाहन करतांना सुरज आणि सोनल यांच्या पालकांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा आपल्या प्रस्तावाचा स्विकार केला. त्याबद्दल त्यांचेप्रती कृतघ्नता व्यक्त केली. आपल्या मार्गदर्शनाचा स्विकार करून सुरज व सोनल ह्या नवदाम्प्त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचाराचे अनुकरण केल्याने डाँ. गावतुरे यांनी कौतुक केले. वैवाहीक कर्मकांडाला फाटा देत नावादाम्पत्यानी महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. कोणताही मुहूर्त, अक्षदा आणि वाजाविना शेकडों नागरीकांच्या साक्षीने पार पडलेल्या सोहळ्यात सुरज आणि सोनल वैवाहीक बंधनात बांधल्या गेले. केवळ महापुरुषांनी मानवाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची आठवण करीत विचारांचे अमृत पाजत महात्मा ज्योतिबा फुले रंजित मंगलाष्टके म्हणून अनोख्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा सत्कार केला. डॉ. समीर कदम यांनी सुरज व सोनल ह्यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा लावतांना उपस्थितांना माहिती दिली. यावेळी वरवधु पक्षाकडील आप्तस्वकीय आणि पाहुणे मंडळीसह श्रीकांत शेंडे, संजय आदे, ऋषी गुरनुले, सुरज गुरनुले, राहुल गुरनुले, शार्दूल खोब्रागडे आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. डाँ. राकेश गावतुरे यांच्या पुढाकाराने तालुक्यात संपन्न झालेल्या सत्यशोधक विवाह सोहळ्याचे राजुरा परिसरात स्वागत होत आहे. इतरही समाजाने अश्या विवाह सोहळ्याचे अनुकरण केल्यास समाजात नवा आदर्श निर्माण होईल. असे बोलल्या जात आहे.