कोरपना - राजकीय पत्रकारांची खंडणीसाठी धडपड या मथळ्याखाली बातमी NEWS34 वर प्रकाशित झाल्यावर संबंधितांची पायाखालील वाळू सरकली.
अनेक शुभचिंतकाना फोन लावून झाडाझडती घेण्यात आली मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली.
अवैध धंदे बंद करण्यासाठी आधी निवेदन द्यायला हवे, कारवाई होत नसेल तर स्वतः धाड टाकून ते अवैध धंदे बंद करायला हवे, मात्र हवेत बाण मारीत निवेदनाची कॉपी समाज माध्यमाद्वारे व्हायरल करून आम्ही आता पुढाकार घेतला असे दर्शविणे हे कितपत योग्य आहे?
अवैध धंद्यांचा त्रास असेल तर पोलीस प्रशासनाला भेटून त्यांना कारवाईला भाग पाडायला पाहिजे होतं.
मात्र तसे काही झाले नाही, मागील वर्षभरापासून ते अवैध धंदे सुरू असल्याची बतावणी करणे व एक वर्षानंतर राजकीय पत्रकार यांनी आवाज उचलणे यामागे काहीतरी गडबड आहे. Illegal activity
पोलीस कारवाई करीत नाही अशी सतत खात्याची बदनामी करणे योग्य नाही, कारण सरकार तुमची आहे आणि तुमचा जोर चालत नसेल तर सत्ताधारी पक्षात राहून काय उपयोग?
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे मात्र हा आरसा आज घाणेरडा होत चालला आहे.
अनेक पत्रकार काही पैश्यासाठी आपली लेखणी विकत आहे.
दुसऱ्याचे अवैध धंदे आपल्या हद्दीत सुरू व्हायला हवे हा यामागचा उद्देश आहे, मात्र तो उद्देश पोलीस प्रशासन कधी पूर्ण होऊ देणार नाही.
News34 वर मानहानीकारक दावा ठोकू असे मॅसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे, त्यांनी खुशाल दावा ठोकावा.
पोलीस संबंधित व्यक्तीवर लवकरचं कारवाई करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
