News 34 chandrapur
चंद्रपूर - 62 व्या महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या निमित्तावर चंद्रपूर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पोलीस मुख्यालयात सकाळी आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी व सतत 15 वर्षे उल्लेखनीय काम करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देत गौरव करण्यात आला. Maharashtra day
ज्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, नक्षल सेलचे पोलीस हवालदार अशोक गोडे व किसन राठोड यांचा समावेश आहे. Chandrapur police
तसेच भद्रावती येथील चर्चित हत्याकांडाचा तपासात उत्कृष्ट कार्य करीत सदर प्रकरणाचा तात्काळ उलगडा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देत गौरव करण्यात आला.
सदर प्रकरणात उत्कृष्ट कार्य करणारे सायबर सेल चे मुजावर अली, संतोष पानघाटे, भास्कर चिंचवळकर, उमेश रोडे, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि संदीप कापडे, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी अतुल कावळे, राजेंद्र खनके, संजय आतकुलवार, सतीश बघमारे, गोपाळ आतकुलवार, प्रशांत नागोसे, अनुप डांगे, मिलिंद जांभुळे, गणेश भोयर, संदीप मुळे यांनी विधिसंघर्ष महिला आरोपी व तिच्या साथीदाराला अटक करीत मोलाची कामगिरी बजावली होती.
