News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - नादुरुस्त असलेली एस टी बस बसचा यांत्रिक राजू दांडेकर हा बस दुरुस्ती करीत असतांना डेपोमधील बस दुरुस्त करणाऱ्या यांत्रिकाचा अंगावर गेल्याने यांत्रिक गँभीर जखमी झाला. लगेच त्याला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेले असता त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सादर घटना आज दुपारी १-३० वाजेच्या सुमारास घडली असून मृतक यांत्रिक राजू दांडेकर (वय 45 ) रा.चंद्रपूर असे आहे. मुल येथील बस स्थानकावर एम.एच.डी.8243 क्रमांकाची बस नादुरुस्त होती त्या बसला दुरुस्ती करण्यासाठी चंद्रपूर डेपोतील बस यांत्रिकी राजू दांडेकर हा मुलं येथे बसच्या समोर होता दरम्यान उंच भागावर उभी असलेली बस अचानक समोर सरकल्याने यांत्रिकी राजू दांडेकर यांच्या अंगावरच आल्याने दांडेकर गँभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी चंद्रपूरला नेतानाच त्याची प्राणज्योत मालवली. करिता कर्तव्यावर करीत असतांनाच राजू दांडेकर मृत्यू पावल्याने चंद्रपूर परिवहन विभागात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
