News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सोमवार ला स्वतः सिंदेवाही ठाणेदार घारे यांनी आपल्या पोलिस स्टाफ सह शहरात भरणाऱ्या आठवडी बाजाराची तसेच आठवडे बाजारात असलेल्या पोलीस मदत केंद्र कक्षाची पाहणी केली.
सिंदेवाही आठवडी बाजार हा दर सोमवारी नगरपंचायत इंदिरानगर परिसर टेकरी मार्गावर भरविला जात असतो. त्यामुळे सिंदेवाही च्या तालुक्यातील सभोवतालच्या तसेच लहान-मोठ्या गावातील नागरिक बाजारात खरेदीसाठी येत असल्याने सोमवारी आठवडी बाजारात गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बाजारात वाढत होते. Chandrapur police
तसेच बाजारात येणाऱ्यांचे दुचाकी चारचाकी यांची पार्किंग सोय नसल्याने नागरिक सदरील वाहने आठवडी बाजार भरणाऱ्या रस्त्यावर उभे करून देत असत. त्यामुळे या गर्दीच्या फायदा घेत चोरटे वाहनांची चोरी ,पैशाची चोरी करतील. असे निदर्शनास येताच, सिंदेवाही ठाणेदार घारे यांनी तात्काळ नगरपंचायत सिंदेवाही अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सल्ला तसेच विचार विनिमय झाल्यावर ठाणेदार यांनी आठवडी बाजारात पोलीस मदत केंद्रची स्थापना केले. व बाजारात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाची सोयीस्कर असे पार्किंग तयार केले. त्यामुळे सिंदेवाही येथील नागरिकांनी ठाणेदार घारे, पीएसआय महले व त्यांचे पोलीस स्टॉपचे सहकाऱ्यांचे आभार मानले.

