चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील काही अंतरावर असणाऱ्या वेंडली गावात 9 मे ला पहाटे 3 वाजता बॉटल्स च्या गोडाऊन ला अचानक आग लागल्याने एकचं खळबळ उडाली.
शहरातील जलनगर वार्डात राहणाऱ्या अब्दुल खलील अब्दुल कादर यांचं KK बॉटल्स ट्रेडर चे गोडाऊन वेंडली या ठिकाणी असून पहाटे 3 वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली, या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाले. Huge fire
अग्निशमन विभागाने तात्काळ वेंडली ला पोहचत आगीवर नियंत्रण मिळविले.
