News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल - मुल शहराच्या सुशोभीकरणासाठी मुल येथे अत्याधुनिक १० कोटी रुपये खर्चाचे बसस्थानक उभारण्यात आले असून अत्याधुनिक तर सोडाच बसस्थानकात बांधण्यात आलेल्या मुत्रीघरात व पाणी नसल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून याची दुर्गंधीने प्रवाशी व परिसरातील नागरिक अस्वस्थ झाले असल्याचे प्रत्यक्ष बोलून दाखविले आहे. Stinky atmosphere
असलेल्या शौचालय मध्ये पाणी नसल्याने लांब अंतरावरून येणाऱ्या प्रवाशांना सुलभ शौचालया अभावी गैरसोय निर्माण झाली असून परिसरातील नागरिक व प्रवासी आणि शाळेचे विद्यार्थी यांनी देखील बसस्थानकविषयी संताप व्यक्त केला आहे.

नवीन बसस्थानकात एकच शौचालय निर्माण करण्यात आले, मात्र त्याची पाण्याअभावी दयनीय अवस्था झाली असून शौचालय व मुत्री घरात पाण्याची दुर्गंधी सुटल्याने नाक दाबुन जावे लागत आहे. बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी हे बसस्थानक सर्व सोईनी युक्त राहील असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. 10 crore bus stand
त्याला आज ४ वर्षाचा कालावधी होत आहे तरी देखील काम पूर्ण झाल्याचे दिसत नाही. यामध्ये अत्याधुनिक सोय तर सोडाच सध्या पिण्याच्या पाण्याची सोय देखील बरोबर नाही. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बसस्थानकात महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी 5 सुनिट आणि शौचालय होते मात्र सद्यस्थितीत एकाच शौचालय तयार करण्यात आल्याने अनेक प्रवाशी बंधू भगिनींना शौचालयासाठी इतरत्र भटकताना दिसून येत आहे. ही सुशोभित असलेल्या मुल शहरासाठी खेदाची बाब असल्याचे बोलले जात आहे. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बसस्थानकात पुरेसे ओटे नाहीत. मात्र 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर असतांना प्रवासी बिचारे ताटकळत उभे राहत आहेत. तरी देखील चंद्रपूर आगाराचे प्रमुख प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोईकडे दुर्लक्ष करीत आहेत.

नवीन बांधलेल्या बसस्थानकापेक्षा जुनेच बसस्थानक चांगले
यापूर्वी असलेल्या जुन्या बसस्थानकात तरी सोय सुविधा बऱ्या होत्या प्रवाशांची तेवढी गैरसोय होत नव्हती,परंतु १० कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात असलेल्या नवीन बसस्थानकात अनेक सोई सुविधांचा अभाव असल्याचे प्रवाशी व नागरिकांचे म्हणणे आहे. पहिले स्लॅब तरी होते आतातर नुसते टिनाचे शेड उभारुन वर पडदे झाकले आहेत अशी प्रतिक्रिया प्रवाशी बांधवांची आहे. वर्तमान स्थितीत मुल बसस्थानकाची अवस्था राहिली तर मुलचे नागरिक व प्रवाशी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील अशी परिसरात चर्चा केली जात आहे.