News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गडचांदूर येथील दी आदित्य बिरला पब्लिक स्कूलतर्फे प्राचार्या अर्चना गोलचा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या मदतीने शाळेतील लहान बालगोपालांसाठी "ग्रीष्म शिबीर"(समर कॅंप)चे आयोजन करण्यात आले. Summer camp
सदर शिबीर 4 ते 14 मे पर्यंत चालणार असून यामध्ये इयत्ता पहिली ते 5 वी च्या 240 विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविल्याचे पहायला मिळत आहे.विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा हा यामागचा उद्देश असून शिबिराच्या माध्यमातून ओरिगामी पेपर क्राफ्ट,मटका सजावट, पिकनिक, नकली ड्रिल सारख्या अनेक मनोरंजक व साहसिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.आंतरिक व बाहेरील खेळांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला असून सदर शिबिरात विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांनी सदर शिबीराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
Aaditya birla school
