News 34 chandrapur
सिंदेवाही - अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा चंद्रपूर चे वरिष्ठ मार्गदर्शक नकटुजी सोनुले यांची कन्या मोहिनी आणि नामदेवराव शेंडे यांचे सुपुत्र गणेश यांचा त्यशोधक विवाह सोहळा थाटात पार पडला अखिल भारतीय माळी महासंघ ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय प्राध्यापक नामदेवराव जेंगठे आणि माननीय अशोक शेंडे सर यांनी सत्यशोधक सोहळा पार पाडला यावेळी कुठलेही कर्मकांडं न करता जा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याच्या अक्षता न करता वधू-वरांवर फुलांचा वर्षाव करून हा सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी वधू-वरांनी मानवपंचांच्या साक्षीने एकमेकांच्या साथीने वैवाहिक जीवन सुरू करण्याची शपथ वधू आणि वर यांनी घेतली.
सत्यशोधक मंगलाष्टके श्री विजय गुरनुले यांनी म्हटली, सत्यशोधक मंगलाष्टके वधू-वरांच्या शपथे नंतर विद्या दानाचा चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वधूपिता श्री नकटुजी सोनुले यांनी 20 हजार रुपयांची पुस्तके समाजाच्या वाचनालय याकरिता दान केली त्याच वेळी अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा चंद्रपूर च्या वतीने रुपये पाच हजाराचे पुस्तके विद्यार्थ्यांना भेट करण्यात आली ही भेट देताना अखिल भारतीय माळी महासंघाचे मार्गदर्शक प्राध्यापक नामदेवराव जेंगठे सर, प्राध्यापक डॉ. कोकोडे सर मुंबईचे विक्रीकर उपायुक्त माननीय किरण गावतुरे सर, डॉ. राकेश गावतुरे ,जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन भेदे, माननीय प्रा माधव भाऊ गुरनुले, प्रा सुरेश भाऊ लोणबले अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष विजय लोनबले ,संघटक एडवोकेट प्रशांत सोनुले, अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकलाताई गावतुरे,प्रा अनिल लोनबले, इंजिनीयर नितीन लोनबले महिला कार्यकर्त्या सीमाताई लोनबले, दिलीप भाऊ मोहुर्ले, ईश्वरभाऊ लोनबले, प्रा पवन गुरनुले, सुधीर ठाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते
