News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान राजकीय उष्णतेच्या वर कधी गेलं नाही, सध्या आगीच्या घटना वाढल्याने राजकीय क्षेत्रात तापमानाचे पडसाद उमटत आहे. Political battel
जिल्ह्यात राजकीय घडामोड असो की घटनेचे पडसाद हे नेहमी राज्यभर पसरतात.
चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास वेगळा आहे, नेहमी नवनवीन इतिहासाची नोंद होत असते.
सध्या जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे.
पण राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो हे जगजाहीर आहे.
एक आहे अनुभवी, मंत्रीपदावर मजल मारलेले, उच्चशिक्षित आमदार सुधीर मुनगंटीवार तर दुसरे आहे, भाजपमधून शिवसेनेत व शिवसेनेतून स्वतःची संघटना स्थापन करीत भरघोस मताने विजय मिळविणारे आमदार किशोर जोरगेवार.
दोघांमध्ये फरक असला तरी आधी दोघांची घट्ट मैत्री ही सर्वाना ठाऊक आहे.
राजकारणात शेवटच्या क्षणात होणारी उलथापालथ यामुळे जोरगेवार यांच्या राजकीय क्षेत्राला कलाटणी मिळाली.
गरीबीतून आज सामाजिक क्षेत्रात मजल मारणारे आमदार म्हणून जोरगेवार यांची ओळख निर्माण झाली आहे.
तर दिलेला शब्द पाळणे, व गंभीर आजारावर रुग्णाच्या खिशावर आर्थिक बोझा न पडू देणार एकमात्र आमदार म्हणजे सुधीर मुनगंटीवार.
सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे तर चंद्रपूर विधानसभेचे किशोर जोरगेवार विद्यमान आमदार आहे.
आधी मुनगंटीवार हे चंद्रपूर विधानसभेचे आमदार होते त्यानंतर आरक्षण घोषित झाल्यावर ते बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकडे वळले.
यामुळे मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरात चांगली पकड आहे.
पण सध्या दोन्ही आमदार एकमेकांच्या विधानसभा क्षेत्रात कूच करीत आहे.
दीक्षाभूमी येथे 50 लाखांचा निधी मंजूर माझ्यामुळे झाला असे प्रसिद्धीपत्रक दोन्ही आमदारांनी जारी केले होते मात्र तो निधी आमदार मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला होता.
दुसऱ्यांदा मूल मार्गावर घडलेल्या जळीत कांडातील मृतकाना मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी 5 लाख रुपये मंजूर झाले मात्र ते आम्हच्या मुळे झाले असा गवगवा दोन्ही आमदारांनी केला होता.
घटना घडली त्यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी तात्काळ मंत्रालयात मुख्य सचिवांना सम्पर्क करीत माहिती दिली व मुख्यमंत्री सहायता निधी मंजूर करावी अशी विनंती केली.
आमदार जोरगेवार यांनी मेलद्वारे मुख्यमंत्री कार्यालय येथे सम्पर्क साधला जोरगेवार यांना मेल द्वारे निधी मंजूर झाला अशी माहिती मिळाली.
मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र मिळाले त्यामध्ये मुख्य संदर्भ मुनगंटीवार यांच्या पत्राचा होता.
आता बाबूपेठ उड्डाणपुलासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला असा गवगवा दोन्ही आमदार करीत आहे.
श्रेयवादासाठी दोन्ही आमदार तीनदा समोर आले, मात्र कांग्रेस यावर फक्त एकच प्रतिक्रिया देत आहे, सरकार आमचे तर निधी तुमचा कसा? असे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोन आमदारांच्या श्रेयवादामुळे नागरिकांचे काम मात्र थांबू नये ही अपेक्षा चंद्रपुरातील नागरिक करीत आहे.
