News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- मूल नगर हे विदर्भातच नव्हे तर राज्यात सुद्धा तादंळासाठी राईस क्लस्टर म्हणून प्रसिद्ध आहे. उच्च प्रतीच्या तांदळाचे उद्योजक निर्माते मुल सारख्या नगरात असल्याने आणि तांदळाची बाजारपेठ जिल्ह्यात मोठी असल्याने इतर राज्यातील व्यापारी येथे तांदळाच्या व्यापारासाठी येतात. येथील उच्च प्रतीच्या तांदळाची देश - विदेशात निर्यात होत असते. मुलपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर सोमनाथ देवस्थान प्रसिद्ध असून एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. तसेच श्रद्धेय कर्मयोगी बाबा आमटे यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेले सोमनाथ प्रकल्प आहे.
सोमनाथ येथे पुराणकालीन शिवमंदिर व बारमाही वाहणारा धबधबा आहे. तसेच येथे विस्तीर्ण परीसरात वसलेले कृषी महाविद्यालय आहे.सोमनाथचा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.सोमनाथचा हजारो हेक्टरचा जंगल परिसर बफरझोन म्हणून आरक्षित केलेला आहे. त्यामुळे यापरिसरात सतत वाघ व ईतर वन्य प्राण्यांचे माहेरघर असल्याने नेहमीच दर्शन होत असते. जिल्हातील व बाहेरील पर्यटक श्रद्धेने व भक्ती भावाने सोमनाथ येथे येतात. परंतु त्यांना ताडोबा नॅशनल पार्क (व्याघ्र प्रकल्प) ची सफारी करता येत नाही, वाघ आणि ईतर वन्यप्राण्यांचे दर्शन करता येत नाही.व निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटता येत नाही. कारण येथे जवळपास एकही ताडोबा सफारी गेट नसल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडत आहे. Tadoba safari सोमनाथ येथे वनविभागाने आणि अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रामुख्याने पर्यटकांसाठी सफारी गेट मंजूर केल्यास स्थानिक ग्रामस्थांना रोजगार मिळेल. तसेच सुशिक्षत बेरोजगारांनाही काम मिळेल. Hotel tourism व हॉटेल टुरीजम व इको टुरिझमला चालना मिळून शासनास महसूल प्राप्त होइल व पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येईल. सोमनाथ येथे ताडोबा सफारी गेट सुरू झाल्यास मूल शहर हे राज्य व आंतरराष्ट्रीय नकाशावर प्रसिध्दीस येईल. करिता लोकप्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यानी शासन व वनविभागाकडे पाठपुरावा करून सफारी गेट मंजूर करण्यास प्रयत्न करावे. ज्यामुळे सर्व जनतेला व पर्यटकांना सोमनाथ येथे गेल्यावर वन्य प्राणी दर्शन व निसर्ग सौंदर्याचा लाभ घेता येईल व पर्यटनास वाव मिळेल.शासनाने जनहीतभावना लक्षात घेऊन सोमनाथ येथे ताडोबा सफारी गेट मंजूर करावे अशी मागणी मूल येथील उच्च प्रतीच्या तांदळाचे प्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जीवन कोंतमवार यांनी केली आहे.
