News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पांदण रस्ते अतिशय महत्वाचे आहे. परंतु अनेक गावचे पांदण रस्ते शासन स्तरावरूनच मंजूर करण्यात आलेले नव्हते.
ग्रामीण शेतकऱ्यांची ही अतिशय महत्त्वाची अडचण लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोशसिंह रावत यांनी शेतकऱ्यांची रास्त मागणी महाराष्ट्र राज्याचे ओबीसी कल्याण व मदत पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांचे कडे लावून धरुन सतत पाठपुरावा केला असता नाम.विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांसाठी हिताचा मुद्दा उपस्थित करुन मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पांदण रस्ते योजने अंतर्गत सण-२०२२-२३ या वर्षाच्या आराखड्यात शासनाने मंजुरी प्रदान केल्याने मुल तालुक्यातील २१ ग्रामीण भागातील गावांना याचा फायदा होणार आहे. याबद्दल तालुक्यातील शेतकरी समाधान व्यक्त केले असून शेतकऱ्यांच्या वतीने मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनूरकर यांनी २१ गावच्या शेतकरी बांधवांच्या वतीने पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांचे जाहीर आभार मानले आहे. मंजूर करण्यात आलेल्या पांदण रस्त्याचे गावे राजोळी १की.मीटर.,चांदपूर १, विरई ४, भवराला २,बोनडला (खु) ३, बोनडला(बूज)-o.५०, बाबराला ३, पिपरी दीक्षित ३, नवेगाव (भु) २.५०, जुनासुरल १.५०, गोवर्धन १.५०, गडीसुरला २, उथलपेठ २.५०, तर टेकाडी, मरेगाव, जानाला, केळझर, नलेशवर, भेजगाव, चकदुगाला या गावात प्रत्येकी १ किलो मीटर अंतराचे पांदण रस्ते करण्यास मंजुरी प्रदान केल्याने मुल तालुका कांग्रेस कमिटी तर्फे अध्यक्ष घनश्याम येनूरकर यांनी सर्व कांग्रेस पदाधिकऱ्यांच्या वतीने व शेतकरी बांधवांच्या वतीने नाम.विजय वडेट्टीवार यांचे जाहीर आभार मानले आहे.