News 34 chandrapur
चंद्रपूर - जुगाराचा घोडेबाजार म्हणजे क्रिकेट या खेळात कोट्यवधी रुपयांचा जुगार खेळल्या जातो, मागील वर्षी गडचिरोली पोलिसांनी IPL जुगार बहाद्दरांवर केलेल्या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामध्ये अनेक आरोपी हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते, गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईने चंद्रपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मात्र वर्ष गेल्यावर सुद्धा चंद्रपुरात पुन्हा पोलिसांना न जुमानता मोठ्या प्रमाणात IPL BETTING सुरू झाली, पण इतक्या मोठ्या प्रमाणात ही सट्टेबाजी सुरू असून सुद्धा चंद्रपूर पोलिसांनी कारवाई का केली नाही? हा मोठा प्रश्न आहे, याच उत्तर म्हणजे चंद्रपुरातही एक वाझे आहे.
चंद्रपुरातील त्या वाझेने या IPL सट्टेबाजाकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला, तुम्ही बिनधास्त सट्टेबाजी करा बाकी मी बघून घेणार असा विश्वास त्यांना दिला. IPL CRICKET 2022
मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या नजरेतून सट्टेबाजी सुटली नाही त्यांनी सट्टेबाजावर कारवाई करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील 2 IPS आयुष नोपाणी व अतुल कुलकर्णी यांचेवर जबाबदारी दिली.
दोघांनी आपले कर्तव्य पार पाडत चंद्रपुरात विदर्भातील मोठ्या बुकीला अटक केली.
घुघुस येथील लॉयड मेटल कंपनी जवळील एका घरात अनेक दिवसांपासून सट्टेबाजी सुरू होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारत सहा बुकींना पकडले.
आरोपी जवळून मोबाईल, 2 चारचाकी वाहन व लॅपटॉप जप्त केले.
मात्र या कारवाई दरम्यान 2 आरोपी फरार झाले, त्यांच्या मागावर पोलीस असून लवकर ते जेरबंद होणार आहे. सदर आरोपी वणी, यवतमाळ व चंद्रपूर, घुघुस मधील आहे. यामध्ये जमील खान उर्फ जम्मू महबूब वय 38, मोहम्मद शेफ शब्बीर चीनी 25, निलेश अरोरा 46, मनीष डफ 44, मोहम्मद असीम मोहम्मद अनीफ 19, एजाज अली तायर अली 40, वणी, रोहित पृथ्वीराज घोरपड़े 26 घुघुस यांचेवर
कलम 420,465,468,471,34 महाराष्ट्र जुगर कायदा 4,5 दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपुरात मागील अनेक दिवसांपासून IPL Cricket Match वर Betting सुरू होती, आता विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या कारवाईने अनेकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
Ipl सट्टेबाजावर आशीर्वाद असणाऱ्या त्या 'वाझेच्या" चौकशीचे आदेश लवकर निघणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
