News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - सोमवार ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा बैठक चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मान. नामदार श्री प्राजक्तदादा तनपुरे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्याच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
प्रमुख प्रवेशामध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा श्री साई बोरवेल्स चे प्रोप्राईटर बंडू साकलवार, युवा सामाजिक कार्यकर्ते रितिक पोगूलवार, रुपेश एडनूतलवार, चेतन लाकडे, देवानंद गुरनूले, दीपक गुरनूले, दीपक घोंगडे, पवन कारेंगवार, आखीप पठाण, नीरज तुपकर, विक्रांत नाकतोडे आदींनी प्रमुख कार्यकर्त्यांनी स्वखुशीने बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांचे नेतृत्व स्वीकारून युवा बांधवांनी पक्ष प्रवेश केला.
पक्षप्रवेश करणाऱ्या युवकांना पक्षात नेहमी सन्मानाची वागणूक मिळेल असा राष्ट्रवादी काँग्रेस च्या उपस्थित नेत्यांनी शब्द दिला.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अहोरात्र झटून पक्ष घरा- घरात पोहचवू असे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी चंग बांधला !
सदर पक्ष प्रवेश करनारे युवक बांधवाना राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे ,महिला शहर अध्यक्ष अर्चना चावरे, महिला तालुका अध्यक्ष नीता गेडाम युवक तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार , तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे , तालुका उपाध्यक्ष दुशांत महाडोळे, शहर महासचिव प्रदीप देशमुख, आदिनी पक्षप्रवेशा बद्दल शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
