News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत बनविण्यात येत असलेल्या बाबुपेठ उड्डाणपूल करीता एकूण रु. ६१.५७ कोटी खर्च अपेक्षित आहे या पैकी रु.१६.३१ कोटी रेल्वेने, रु.५ कोटी महानगरपालिका चंद्रपूर ने व रु.४०.२६ कोटी राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावयाचा होते. माघील साडेसात (७.५) वर्षा पासून महानगरपालिका चंद्रपूर मध्ये भारतीय जनता पार्टी ची सत्ता होती व भाजपाच्या जेष्ठ नेत्यानं कडून या पुलाचे उदघाटन वारंवार करण्यात आले पण महानगरपालिका ज्यात हे सत्तेत होते त्या कडून उडाणपूल बांधकाम करीता द्यावयाचा हिस्सा यांनी दिलेला नाही. Babupeth railway over bridge
फक्त आपल्या प्रभागात रस्ते, नाली व स्वागत गेट बांधकाम मध्ये कोट्यावधी निधी खर्च केले. सत्तेचा गैरफायदा घेत भाजपा महपौर ने राजकीय दबाव टाकून एकाच प्रभागात रु.१.५ कोटी ची कामे कार्यकाळ संपायच्या एक दिवस अगोदर स्थाई-समिति सभेत काढले परंतु ज्या उडाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यास चंद्रपूर शहरातील बाबुपेठ निवासी असलेली नागरिकांच्या दळण-वळण चा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो त्या करीता निधी देण्याची यांची मानसिकता नाही. आज दि २३/०५/२०२२ ला काँग्रेस नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्ते प्रशासक व आयुक्त मनपा चंद्रपूर मा. राजेश मोहिते यान भेटले व निवेदनातून विनंती केली कि काँग्रेस पक्षाचे नेते मा. ना विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा व काँग्रेस नगरसेवकांच्या प्रयत्नाने चंद्रपूर् महाऔश्निक केंद्र कडून प्राप्त झालेली कर राशि ४.८७ लक्ष हे बाबुपेठ उडाणपूल निर्मिती करीत द्यावे जेणे करून बाबुपेठ निवासी नागरिकांची रेल्वे गेट मुळे होत असलेली गैरसोय येत्या पुढील काळात दूर होईल, प्रशासक व आयुक्त मनपा चंद्रपूर मा. राजेश मोहिते यांनी मान्य केले कि चंद्रपुर महानगरपालिकेला ५ कोटी निधी उडाणपूल निर्मिती करीत द्यायचे होते पण ते दिल्या गेले नाही व लवकरच हा निधी देऊ असे त्यांनी मान्य केले नागरिकांच्या हिता करीत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी माजी काँग्रेस गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, माजी शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुनीता लोढीया, माजी नगरसेविका संगीत भोयर, शलिनी भगत, घनशाम वासेकर, सुरेश खपणे, राजेंद्र आत्राम, अरविंद मडावी, विशाल भगत, बिकास टीकादर, मनोज वासेकर शाम राजूरकर सुरेश आत्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
