News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर परिमंडळात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनप्रसंगी मुख्य अभियंता यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. सर्व उपस्थितांनी ध्वजास नमन केले.
Maharashtra foundation day
Maharashtra foundation day
कोविड काळाच्या कटू आठवणींना बाजूला ठेवत, दोनवर्षानंतर साजरा करण्यात आलेल्या या दिवसाचे महत्व कैक पटीने वाढले त्यामुळे आजच्या या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले. ऊन, वारा, पाऊस, थंडी, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सेवा देणाऱ्या व ज्या कर्मचाऱ्यांच्या खांध्यावर महावितरणचा डोलारा आहे अशा कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचाऱ्यांतून उत्कृष्ट कामगार म्हणून चंद्रपूर व गडचिरोली मंडळातून गुणवंत कर्मचारी निवडून त्यांचा सत्कार मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यापूर्वी कोविड मुळे ग्राहकांना सेवा देतांना महावितरणच्या शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. चंद्रपूर परिमंडळातील मंडळातून २९ वाहिनी कर्मचारी व ६ यंत्रचालक अशा ३५ कामाचाऱ्यांचा गुणवंत कर्मचारी म्हणून सत्कार करण्यात आला.
Msedcl
चंद्रपूर परिमंडळाने यावर्षी वसुलीच्या कार्यक्षमतेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला यासाठी ज्या अधिकारी, अभियंता व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष ग्राहकांच्या दारीं जात महावितरणचे आर्थिक स्वास्थ नीट ठेवण्यासाठी वसुलीचे काम पार पाडले. त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
Labour day
५० वर्षांवरील अखिल भारतीय शरीर सौष्ठव स्पर्धेत श्री सुनील गणेश नन्हेट यांनी सुवर्ण चषक पटकावला. ते चंद्रपूर मंडळ अंतर्गत बल्लारशा विभागातील बल्लारशा उपविभाग येथे तंत्रज्ञ, या पदावर कार्यरत आहेत. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा त्यांनी आपली आवड जपली आहे.याआधी पाँडिचेरी येथे झालेल्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी पदक प्राप्त केले आहे त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच मा. संचालक (मा. स.). श्री. नरेश गिते यांनी त्यांच्या यशाची दखल घेत त्यांना प्रशस्ती पत्र प्रदान केले. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे, चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या श्रीमती संध्या चिवंडे यांनी कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या या पन्नास वर्षीय तरुणाचे सत्कार करीत, त्यांना असेच यशस्वी होत महावितरणचा नावलौकिक वाढविण्यास शुभेच्छा दिल्या.
चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत वाहिनी कर्मचारी यांची नावे
श्री. रमेश टेकाम, तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. मनोहर तुराणकर, प्रधान तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. महेंद्र खेडेकर, तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, पुंडलिक राठोड, वरिष्ठ तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. रविंद्र मालोदे, तंत्रज्ञ, चंद्रपूर विभाग, श्री. अमोलकुमार रामटेके, वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. संजय लांडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. राहुल पलंगवार, वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग श्री. नंदकिशोर मोरे, तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. गजेंद्र पिदुरकर, वरिष्ठ तंत्रज्ञ, बल्लारशाह विभाग, श्री. शादाब शेख, तंत्रज्ञ, विभाग बल्लारशाह श्री. राजेंद्र घाबरगुंडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, वरोरा विभाग, श्री. पंकज लांडगे, तंत्रज्ञ, वरोरा विभाग, श्रीमती रेखा पेटकर, वरिष्ठ तंत्रज्ञ, वरोरा विभाग, श्री. राकेश मालोदे, वरिष्ठ तंत्रज्ञ, ब्रम्हपुरी विभाग, श्री. रविंद्र सिडाम, वरिष्ठ तंत्रज्ञ, ब्रम्हपुरी विभाग, श्री. सुर्यभान कोवे, वरिष्ठ तंत्रज्ञ, ब्रम्हपुरी विभाग, श्री. जितेंद्र दोडके, वरिष्ठ तंत्रज्ञ, आलापल्ली विभाग, श्री. ईश्वरन कडालकाराई, वरिष्ठ तंत्रज्ञ आलापल्ली विभाग, श्री. अशोक बावणे, वरिष्ठ तंत्रज्ञ, आल्लापल्ली, श्री. विनोद पुंगाटी, वरिष्ठ तंत्रज्ञ, आल्लापल्ली विभाग, श्री. भाऊजी पेंदाम, वरिष्ठ तंत्रज्ञ, आल्लापल्ली विभाग, श्री. सचिन वानखेडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, आलापल्ली विभाग, श्री. डोमा सहाळा, वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. मनिराज स्वामी, वरिष्ठ, गडचिरोली, श्री. राकेश मांदाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. फिरोजखान पठाण, वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. अनिल नवले, वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्रीमती सुरेखा मडावी, वरिष्ठ तंत्रज्ञ, गडचिरोली विभाग, श्री. मारोती दुर्गे, यंत्रचालक, चंद्रपूर विभाग, श्री.दिनेश रामटेके, यंत्रचालक, बल्लारशाह विभाग, श्री. प्रविण तिखट, यंत्रचालक, वरोरा विभाग, श्री. झुंजर नागोसे, यंत्रचालक, श्री. अरविंद राजगडे, प्रधान यंत्रचालक, गडचिरोली विभाग, श्री. पियुष विश्वकर्मा, यंत्रचालक, आलापल्ली विभाग
चंद्रपूर परिमंडळ अधिकारी कर्मचारी यांची नावे
श्री. धीरज दुपारे, अतिरिक्त्ा कार्यकारी अभियंता, श्री. वेंकटेश्वर शेटटी, अतिरिक्त्ा कार्यकारी अभियंता, श्रीमती ईशा गेडाम, अतिरिक्त्ा कार्यकारी अभियंता, श्री. राहुल धाकले, व्यवस्थापक (विवले) श्री. प्रमोद गुमडेलवार, उप कार्यकारी अभियंता, श्रीमती कांचना झेल, उप कार्यकारी अभियंता, श्री. लक्ष्म्ण शिरपूरकर उप कार्यकारी अभियंता, श्री. अमोल पिंपळे, सहाययक अभियंता, श्री. नितीन नगराळे, सहाययक अभियंता, श्री. प्रशांत चंद्रीकापूरे, सहाययक अभियंता, श्री. सचिन भागवत, सहाययक अभियंता, श्री. प्रदिप जींदे, उप व्यवस्थापक (विवले), श्री. पुरूषोत्त्म साखरकर उप व्यवस्थापक (विवले), श्री. बंडु कुरेकर, मुख्य लिपिक, श्री. विवेक पाटील, सहाययक लेखापाल, श्री. बाबाराव ताजणे, उच्चस्त्र लिपिक (मासं), श्री. नितिन पिंपळशेंडे, उच्चस्त्र लिपिक (लेखा), श्री. अमोल खोंड, उच्चस्त्र लिपिक, (लेखा), श्रीमती मनिषा मांढरे, निम्नस्त्र लिपिक (मासं), श्री. सुरजकुमार कुळमेथे, निम्नस्त्र लिपिक (मासं), श्रीमती रोशनी भोले, निम्नस्त्र लिपिक (मासं), श्रीमती शारदा नारे, निम्नस्त्र लिपिक (मासं),

