News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- दिनांक १६ मे 2022,रोज सोमवारला मुल येथे अखिल भारतीय माळी महासंघ ची तालुका स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची चिंतन बैठक आयोजन करण्यात आली. यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात रद्द झालेले ओबीसी आरक्षण आणि ओबीसींची जातिनिहाय जनगणना यावर गंभीर चिंतन व विचार मंथन करण्यात आले. Obc reservation
ओबीसी आरक्षणाला कोणतेही सरकारचा आणि कोणत्याही पक्षाचा विरोध नसताना ओबीसी आरक्षण आणि ओबीसी जातीना न्याय का दिला जात नाही असा सवाल बांधवांतर्फे करण्यात आला. ओबीसीचे छुपे शत्रू कोण असा सवाल या बैठकीत करण्यात आला. समर्पित आयोगाला त्याबाबत निवेदन देण्याचा ठराव पारित करण्यात आला सोबतच जर सवैधाणीक आरक्षण ओबीसींना मिळत नसेल तर राजकीय पक्षांनी सत्तापक्ष असो की विरोधी पक्ष असो यांनी जो पर्यंत ओ.बी.सी.ना आरक्षण दिला जाणार नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकवा अशी मागणी करण्यात आली.
दिनांक २८-५-०२२ ला ओ.बी.सी.आरक्षण समिक्षा संदर्भात नागपूर येथे भाटिया आयोग येणार त्यांचे समक्ष ओ.बी.सी.समाजाची आर्थिक, राजकीय, सामाजिक, मागासलेपना, शैक्षणिक यावर साक्ष नोंदविण्यासाठी तालुका स्तरावर ओ.बी.सी.सेल. काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली २५ सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली. या बैठकीला मार्गदर्शक ओबीसी नेते अँड. राजेंद्रभाऊ महाडोळे, मा.नानाजी आदे जि.प. सदस्य तथा जिल्हाध्यक्ष अ.भा.माळी महासंघ चंद्रपूर, श्री.नाकतोडे सर जिल्हा अध्यक्ष यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डॉ. पद्माकर लेनगुरे माजी पं. स सदस्य सौ.वर्षाताई लोनबले, मा.पं.स.सदस्य,प्रदिपभाऊ वाणी सरपंच विरई, सतिश पाटिल, टेकडी सरपंच चौधरी, सुशी सरपंच अनिल सोनुले, अनिल शेंडे चिरोली, गुलाब शेंडे डोंगरगांव, प्रदिप वाढई भेजगाव, माजी प्राचार्य, बंडूभाऊ गुरनुले, राकेश मोहूले, वासुदेव जी गुरनुले चिमढा, डॉ दौलत बी शेंडे, चिमढा विनायक निकोडे, राजेन्द्र वाढई कांतापेठ, आदी समाजबांधव उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक क्रांतीज्योत सेवा संघाचे अध्यक्ष ईश्वर लोनबले, यांनी केले।संचालन युवा नेते ओमदेव मोहुले यांनी केले असून उपस्थितांचे आभार नंदूभाऊ बारसकर जेष्ठ समाजसेवक यांनी मानले.
