News 34 chandrapur (प्रतिनिधी/गुरू गुरनुले)
मुल - नांदगाव सेवा सहकारी संस्थेच्या आज झालेल्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चंद्रपुर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कांग्रेस नेते श्री संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात व पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, आणि माजी जि. प.सदस्य प्रशांत बांबोले यांच्या सहकार्याने सेवा सहकारी संस्था नांदगांवचे सर्वच्या सर्व १३ पैकी १३ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला तर विरोधी बाकावर माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अहिरकर व निलेश मगणुरवार यांच्या नेतृत्वात लढवलेल्या शेतकरी विकास पॅनलने एकही जागा निवडून न आणता त्यांचा दारुण पराभव झाल्याने शेतकरी विकास पॅनेलची चांगलीच नामुष्की झाली. Congress news कांग्रेसच्या विजयी उमेदवारामध्ये सुनंदा सुनील काळे, सखुबाई गुडडी गम्पलवार, गंगाधर कवडू शिंदे, प्रकाश आंबटकर, प्रभाकर अमलवार, सदाशिव मशाखेत्री, वसंत मोहूर्ले, नीलकंठ नरसपुरे, संदीप रायपल्ले, अशोक उमक, मंदाबाई लाकडे, त्रिमूर्ती नाहगमकर हे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले असून कांग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोशसिंह रावत, पं स.माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, माजी जि. प.सदस्य प्रशांत बांबोले सहकार्य करणारे सर्व कांग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे तालुका कांग्रेसच्या वतीने जाहीर आभारही मानले आहे.
