News 34 chandrapur
चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत, मार्च २१ते मार्च २२या वर्षभराच्या कालावधित चंद्रपूर मंडल् व गडचिरोली मंडलांतर्गत सहाही विभागात, वीजचोरी विरूध्द विविध मोहिमा राबविण्यात आल्या.या मोहिमांत चंद्रपूर व गडचिरेाली मंडलात एकंदरीत २ हजार १८१ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या.
या वीजचोरांनी एकंदरीत २ कोटी २९ लाख रूपयांची वीजचोरी केल्याचे उघडकिस आले आहे. यात १ हजार ५६० वीजचेार हेआकडेबहाद्दर तर ६२१ वीजग्राहकांनीवीजेच्या मीटर्सषी छेडछाड करून वीजेचीचोरी केल्याचे निष्पन्न झाले. या सर्व वीजचेारांनी एकंदरीत १२ लाख ९३ हजार ७३६ वीजेच्या युनिटसची वीजचेारी/बेकायदा वापर केला. चंद्रपूर मंडळात ३५० आकडे बहाद्दर तर गडचिरोली मंडळात १ हजार २१० आकडे बहाद्दरांना महावितरणने दण्का दिला आहे. Msedcl

या सर्व वीजचोरांविरुध्द वीजकायदा २००३ च्या कलम १३५व १३८ अंतर्गत कारवाईकरण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून वीजचोरीची व तडजोड रक्कम वसुल करण्यात आली आहे. केल्या गेलेल्या वीजचेारीची व तडजोड रक्क्म नभरणाऱ्या ७३ वीजचोरांविरोधात पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहे. संध्याकाळी, रात्री मुख्यत्वे आकडा टाकून करण्यात येणाऱ्या वीजचेारीवर करडी नजर ठेवण्यास महावितरणच्या विशेष चमू सर्वत्र कार्यरत आहेत. वीज चोरींमुळे वीज हानी वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो व वीज पुरवठा व मागणीचे गणित बिघडते विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो.
चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत चंद्रपूर मंडलाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे व गडचिरोली मंडलाचे अधिक्षक अभियंता रविंद्र गाडगे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर, वरोरा, बल्लारशा, आलापल्ली, गडचिरोली, ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाईत्यांच्या उपविभागिय व शाखा अभियंता तसेचसहकाऱ्यासोबत पार पाडली. वीजचोरी एकसामाजिक अपराध असून वीजचोरी करून कोळसा सारख्या सिमीत संसाधनापासून तयारहोणारी वीज चोरून वीजेचा बेकायदा वापर करणारे देशाच्या संपत्तीवरच घालाघालत असतात. Power theft त्यामुळे वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे, कायदेशीर मार्गाने वीजवापरण्याचे तसेच वीजबील वेळेवरभरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनचंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.