वरोरा - मौजा सोईट येथील वर्धा नदीच्या पात्रात रात्री च्या सुमारास गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी कर्मचाऱ्यांसहित धाड मारत 6 हायवा ट्रक, 2 टिप्पर, 2 पोकलन मशीन व रेतीसाठा असा एकूण 2 कोटी 60 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर वाळू घाटाचा लिलाव झाला आहे मात्र कोणत्याही मशीन द्वारे व रात्रीच्या सुमारास वाळू उत्खनन करण्यास मनाई असताना सुद्धा आरोपींनी सुसाट वाळू उपसा करीत प्रशासनाचा महसूल बुडविण्याचे काम केले.
मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांच्या सतर्कतेने वाळू तस्करांवर काही प्रमाणात चाप बसला आहे. Sand mafia
सदर प्रकरणी 17 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर कारवाई आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात पोउपनी किशोर मित्तरवार, दीपक दुधे, दिलीप सूर, मनोहर आमने, मोहन निषाद, सूरज मेश्राम, दिनेश मेश्राम, दीपक मेश्राम व विठ्ठल काकडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

