News 34 chandrapur
चंद्रपूर:-- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियमात सूट देत मास्क सक्ती हटविली होती. मात्र काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून कोरोना रुग्ण वाढ सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 14 एप्रिलला शेवटच्या रुग्णाला सुट्टी मिळाल्याने चंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त झाला मात्र 16 दिवसांनी पुन्हा कोरोना रुग्ण मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील बल्लारशाह येथे एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. Corona return
कोरोनाबाधित महिला आपल्या पतीसह घरी वास्तव्याला राहत होते, त्या महिलेला सर्दी, ताप व खोकला झाल्याने त्या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली, कोविडची पुष्टी झाल्यावर त्या महिलेला कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
महिलेला नेमक्या कोणत्या व्हेरियंट ची लागण झाली याबाबत सध्या माहिती मिळाली नाही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्या महिलेची प्रकृती बरी आहे, मात्र नागरिकांना सध्यातरी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
