News34 chandrapur
चंद्रपूर - 19 मे ला अजयपूर जवळ चंद्रपूरला हादरवणारी घटना घडली, 2 ट्रक च्या धडकेत चंद्रपूर-मूल मार्गावर आगीचे तांडव नागरिकांनी बघितले, दुःखद बाब म्हणजे या घटनेत एकूण 9 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला.मूल कडे जाणाऱ्या डिजल टँकर क्रमांक MH40BG4060 व मूलमार्गे चंद्रपूर कडे लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक MH31CQ2770 या दोन्ही वाहनांच्या वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणाने चालवीत परस्पर धडक दिली. Horrible fire
या धडकेत दोन्ही वाहनांनी पेट घेतला, सदर आगीने रौद्र रूप धारण केले, या आगीत डिजल टँकर मधील वाहन चालक व कंडक्टर व दुसऱ्या ट्रक मधील वाहन चालक सहित 7 असे एकूण 9 नागरिकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तपास केल्यावर वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र, परवाना व स्पीड गव्हर्नर वैध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
बल्लारपूर शहरात राहणारे वाहन मालक हितेश मोगरे यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक MH31CQ2770 या वाहनांची नोंदणी वैध नसल्याने सदर वाहनाचा सार्वजनिक रस्त्यावर वापर करण्यात आला.
वाहनाचा परवाना व योग्यता वैध नसल्याने या वाहनाचा वापर केला गेला, व वाहना भीषण अपघातास कारणीभूत ठरले.
या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यावर कलम 279, 304 अ, भांदवी सहकलम मोटार वाहन कायदा सहकलम 184 या गुन्ह्यात कलम 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची कलम वाढविण्यात आली आहे.
