News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील 150 वर्षांपासून विदर्भात झाडीपट्टी रंगमंच गाजत असून आता झाडीपट्टी कलावंतांनी थेट रुपेरी पडद्यावर धडक दिली आहे.Bollywood, Hollywood, Tollywod, Kollywood सारख्या धर्तीवर आता Zollywood नामक चित्रपटाची निर्मिती विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाली.
रंगमंचावर सलग तीन तास जिवंत अभिनय करीत झाडीपट्टी रंगभूमीने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
आता झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांचा चित्रपट झोलिवूड प्रदर्शनासाठी तयार असून येत्या 3 जून ला हा चित्रपट राज्यभरातील 480 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक तृषांत इंगळे, लेखिका आसावरी नायडू लिखित या चित्रपटात विदर्भातील 130 कलावंत तर चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 50 हुन अधिक कलावंतांनी अभिनय केला आहे.
चंद्रपुरातील सुप्रसिद्ध झाडीपट्टी कलावंत निशा धोंगळे व सपना आवळे यांची चित्रपटात मुख्य भूमिका असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा अशी विनंती पत्रकार परिषदेमार्फत निशा धोंगळे यांनी प्रेक्षकांना केली आहे.

