News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दिनांक 19/04/2022 रोज मंगळवारला मुल तालुक्यातील आदर्श ग्राम मौजा कोसंबी येथे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले. Zp Chandrapur
या कार्यक्रमाला उपस्थित कपिलनाथ कलोडे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद चंद्रपूर, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील (BDO) पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी आवर्जुन उपस्थित होते. याप्रसंगी रविंद्र किसन कामडी सरपंच ग्रामपंचायत कोसंबी, यांनी कोसंबी गावांमध्ये फीरून त्रिस्तरीकण टाके, सार्वजनिक शोषखड्डा, Earthworm Fertilizer Project, कंपोस्ट खत प्रकल्प, प्लास्टिक संकलन केंद्र,नाडेप टाके, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शोषखड्डे,फुल उद्यान, इत्यादी विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करुन चर्चा केली आणि प्रत्यक्ष विषयांवर सखोल पणे माहिती सांगून मार्गदर्शन केले.
यावेळी सुनिल कारडवार,सं.वि.अ.मुल, मंगेश आरेवार संवर्ग विकास अधिकारी,भद्रावती, राजेश राठोड संवर्ग विकास अधिकारी, वरोरा, प्रणाली कोचरे संवर्ग विकास अधिकारी, चिमुर/नागभिड प्राजक्ता भस्मे संवर्ग विकास अधिकारी ब्रम्हपुरी, संजय पुरी, सं.विअ. सिंदेवाही, सुनिता मरस्कोल्हे सं.वि.अ. सावली, धनंजय साळवे सं.वि.अ.प पोंभुर्णो, शेषराव बुलकुंडे गोंडपिपरी, किरणकुमार धनवडे सं.वि.अ बल्लारपूर/राजुरा, आशुतोष सपकाळ सं.वि.अ. चंद्रपुर, विजय पेंदाम, सं.वि.अ. जिवती, दिलीप बैलनवार सं.वि.अ. कोरपना आणि सुरज प्रकाश आकनपल्लीवार, ग्रामसेवक ग्रा.पं कोसंबी, सारिका गेडाम उपसरपंच कोसंबी, ग्रा.पं च्या सदस्या चंदाताई विनोद कामडी, सुवर्णा कावळे, अरूणा वाढई, रोशनी मोहुलै, अर्चना मोहुर्ले पोलिस पाटील कोसंबी, जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, गटलेवार सर आणि सर्व शिक्षकवृंद, ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी बचत गटाचे सर्व सदस्य आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
