News 34 chandrapur
बल्लारपूर - शहरात संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या चौघांवर बल्लारपूर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली.वर्ष 2013 ते 2021 पर्यंत 28 वर्षीय अजय झांझोटे, 24 वर्षीय राहुल बिडलांग, 40 वर्षीय रवी उर्फ शंभू झांझोटे व 25 वर्षीय शिवकुमार उर्फ शिब्बू झांझोटे यांनी अनेक दुखापतीचे गुन्हे केले. अटक झाल्यावर त्यांची गुन्हेगारी थांबणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र जामिनावर बाहेर पडताच चौघांनी पुन्हा गुन्हे करणे सुरू ठेवले.
Deportation
Deportation
त्यांच्या दुखापतीच्या गुन्ह्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यांच्याविरोधात नागरिक बोलायला घाबरत होते, त्या चौघांवर वारंवार विविध गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली मात्र त्यानंतर त्यांच्या वर्तणुकीत काही बदल झाला नाही. Organized criminals
त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित करीत त्यांचे विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव कलम 55 अनव्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पुढे ठेवण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्हेगारांबाबत गंभीर दखल घेत चंद्रपूर जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले.
सदर गुन्हेगार चंद्रपूर किंवा बल्लारपूर हद्दीत कुणालाही दिसल्यास त्यांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली आहे.
