News 34 chandrapur
दुर्गापूर - लहान भावाने मोठ्या भावावर कुऱ्हाडीने वार करीत निर्मम हत्या केल्याची घटना आज दुपारी 3 वाजता दरम्यान दुर्गापूर परिसरात घडली. Alcoholism
दुर्गापुरातील कोंडी वार्ड क्रमांक 5 मध्ये राहणाऱ्या खोवे कुटुंबातील मोठा मुलगा 42 वर्षीय प्रदीप तुळशीदास खोवे याला दारूचे अतिव्यसन होते.
दारूच्या व्यसनापायी आई-वडिलांना त्रास देत मारहाण करायचा, प्रदीप च्या त्रासाला कंटाळून अनेकदा कुटुंबीयांनी प्रदीपच्या विरोधात तक्रार दिली होती. Murder
दुर्गापूर पोलिसांनी प्रदीप वर प्रतिबंधक कारवाई सुद्धा केली होती, मात्र त्यानंतर ही दारूच्या नशेत कुटुंबाला त्रास द्यायचा. The younger brother murdered the older brother
26 एप्रिलला दुपारी प्रदीप हा घरी खाटेवर बसला असताना त्याचा लहान भाऊ 35 वर्षीय जगदीश तुळशीदास खोवे याने कुऱ्हाडीने प्रदीप वर वार केले.
प्रदीप ला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला.
वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक झाली नव्हती, पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूर पोलीस करीत आहे.
