News 34 chandrapur
चंद्रपुर - तारुण्यात पदार्पण करताना सुदृढ असोत वा दिव्यांग प्रज्ञाचक्षु युवती महिला असो सर्वाना सारखेच सामोरे जावे लागते.
याची कूचम्बना व गैरसमज यावर क्षितिज फाऊंडेशनच्या सामाजिक युवा कार्यकर्त्या सौ ,स्नेहल चौधरी कदम यांनी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन व संवाद साधला व सर्वांना मासिकपाळी बद्दल गैरसमज व सविस्तर माहितीचे याप्रसंगी आदान प्रदान करण्यात आले. Menstrual days
जागतिक मासिक पाळी दिवसाचे औचित्य साधून ज्ञानार्चना दिव्यांग व प्रज्ञा चक्षु मुलींसंमवेत प्रश्नोत्तरे ही झालीत. मुलींनी ही समाधान व्यक्त करून स्नेहल चौधरी कदम यांचे भरीव आभार मानले.
मुंबईच्या कम फर्थ फौंउडेशनच्या शर्वील गायकवाड द्वारा सॅनिटरी नॅपकिन सर्जिकल मास्क व सॅनिटायझर बॉटल संस्थाध्यक्षा अर्चना मानलवार यांना उपलब्ध करून देण्यात आल्यात तसेच सीमा ठाकूर यानी मिठाईचे वितरण केले.
जगन्नाथबाबा महिला दिव्यांग श्रमात झालेल्या विधायक कार्यक्रमाला अर्चना मॅडम, ज्योती मॅडम ,कुंदन सर ,दूधलकर ,रवी राठोड, प्रणाली येरपुडे यांनी सहकार्य दिले सोबतच विकलांग सेवा संस्था शिवभोजन केंद्रात ही युवती व महिलांना मासिक पाळी उपयुक्त साहित्य वितरित करण्यात आले त्यासाठी पूजा पा न्हेरकर ,देवराव कोंडेकर, खुशाल ठलाल, अशोक खाड़े ,प्रसाद पा न्हेरकर यांनी सहकार्य दिले.
