News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल :- धानावर आधारीत विविध उदयोगांसाठी राज्य शासनाने दीडशे कोटी रूपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करावी अशी मागणी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य प्रकाश पाटील मारकवार यांनी पत्रकार परिषदेत केली. मेगा क्लस्टर उदयोगाच्या माध्यमातून मूल तालुक्यात अशा प्रकारचा शेती पुरक उदयोग निर्माण झाल्यास शेतक-यांचा विकास होईल आणि जवळपास पाच हजार लोकांना रोजगार मिळेल.
अशा उदयोगासाठी माझी स्वताची बावीस एकर जमीन देण्याची तयारी त्यांनी यावेळी बोलून दाखविली.पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा हे चार जिल्हे धानाचे कोठार म्हणून समजले जाते. धान उत्पादक पटटयातील मूल हे ठिकाण सुदधा तांदूळ आणि त्यावरील प्रक्रिया केंद्रासाठी एक महत्वाचे ठिकाण मानले जाते.येथील तांदूळ उच्च प्रतिचा असल्याने महाराष्टासह केरळ,पंजाब,तामिळनाडू,कर्नाटक आणि लगतच्या राज्यात मोठी मागणी आहे. परंतु,राईस मील व्यतिरीक्त धानावर आधारीत इतर मोठे उदयोग धान उत्पादक पटटयात नाही. मेगा क्लस्टर उदयोगाच्या माध्यमातून शेती पुरक उदयोगाला चालना मिळू शकते. परंतु यासाठी शासन आणि प्रशासनाची उदासिनता दिसून येते. पश्चिम महाराष्टासाठी भरीव निधीची अर्थसंकल्पात तरतूद करीत असताना विदर्भाच्या विकासाकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसते आहे. धान उत्पादक पटयातील शेतकरी आणि त्यावर आधारीत इतर घटकांच्या विकासासाठी शासनाकडे विकास आराखडाच नाही. जवळपास दीडशे कोटी रूपयांची आवश्यकता आहे.पंरतु याबाबतचा साधा प्रश्नही विधी मंडळात उचलल्या जात नाही.याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. याबाबत अंदाजपत्रकात राज्यशासनाने तरतूद केल्यास मोठया उदयोगाची निर्मिती होण्यास मदत होईल. धानापासून उप उत्पादनाचे मोठे फायदे होतील. धानाच्या कोंडयाचा वापर विदयुत निर्मिती, कुकूसापासून राईस ब्रॅंड तेल ,बारीक तांदूळ म्हणजे खंडा यापासून इडली,रवा,दोसा पावडर,तांदळाच्या बाय प्रोडक्टमुळे इथेनॉल इत्यादी उदयोग उभारणीस मदत होईल.त्यातून जवळपास पाच हजार लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होउ शकते.अन्न प्रक्रिया औषध निर्मिती प्रसाधने यासारख्या उत्पादनावर आधारीत उदयोगाचा विचार तसेच राष्टीय संशोधन केंद्र उभारणें आवश्यक आहे.असे मत प्रकाश पाटील मारकवार यांनी व्यक्त केले.
नागपूरी संत्री,नाशिकची द्राक्षी,वायगावची हळद आणि भिवापूरची मिरची ज्याप्रमाणे प्रसिदध आहे, त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हयातील तांदूळ बारीक रूचकर आणि पोषक आहे.त्याला एका विशेष बॅ्रंडची प्रसिदधी आवश्यक आहे.राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निधीद्वारे या उदयोगाची स्थापना करावी अशी मागणी आहे. मूल मध्ये मेगा क्लस्टर उदयोगासाठी आपण स्वता पाठपुरावा करणार असल्याचे प्रकाश पाटील मारकवार यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला चिखली येथिल उमाजी मंडलवार उपस्थित होते.
