चंद्रपूर - खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यात चोरीच्या प्रयत्न करणाऱ्या 3 आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केल्यावर त्यांनी अनेक पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली.
25 एप्रिलला सरकार नगर स्थित खासदार धानोरकर यांच्या बंगल्यावर घरफोडीचा प्रयत्न झाला होता, त्याबाबत रामनगर पोलिसात तक्रार दिल्यावर जिल्ह्यातील खासदारांचे घर चोरट्यापासून असुरक्षित असल्याची भावना नागरिकांच्या मनात येऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत तिघांना अटक केली.
गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि हर्षल अकरे , पोउपनि विनोद भुरले व डि.बी. स्टॉफ असे गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट देवून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात आला. Robbery
अवघ्या काही तासात गोपनिय बातमिदाराचे माहिती वरून आरोपी नामे १ ) रोहीत आदेश इलमकर , वय २४ वर्ष , २ ) शंकर श्रीराम नेवारे , वय २० वर्ष दोन्ही रा . समतानगर , वार्ड क्रमांक ६ दुर्गापुर , चंद्रपुर ३ ) तनविर उर्फ दानिश कदीर बेग , वय - २० वर्ष , रा . भंगाराम वार्ड, चंद्रपुर यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी पोस्टे रामनगर हद्दीत तसेच पोस्टे चंद्रपुर शहर येथे खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली , १ ) अप . क्र . ३७३/२०२२ कलम ४५७, ३८० भादंवि २ ) अप . क ४०५/२०२२ ४५४, ४५७, ३८० भादंवि ३ ) अप . क्र ३ ९९ / २०२२ ३७ ९ भादंवि ४ ) अप . क ४०४ / २०२२, ४५७,३८०,५११ भादंवि पोस्टे , चंद्रपुर शहर ५ ) अप . क्र १७ ९ / २०२२, ३७९ भादंवि ६ ) अप . १ ९ १ / २०२२, ४५७, ३८० भादंवि जप्त माल : ( १ ) आरोपीच्या अंगझडतीत नगदी रोख रक्कम १,२०० / -रु २ ) एक बजाज कंपनीची पांढ - या काळ्या रंगाची बजाज प्लसर एम. एच. ३४ बि. वाय. ५६८७ कि.अं. १,००,००० / - रु ३ ) बजाज सि.टी. १०० काळया रंगाची नंबर प्लेट नसलेली कि.अं. ३०,००० / -रु ( ४ ) टि . व्ही . एस . स्टार सिटी एम . एच ३४ बि . वाय . ८७८२.अं. ३०,००० / -रु . ( ५ ) २ नग चांदीचे चाळ वजन अंदाजे २५ ग्रॅम कि.अं. १,००० / - रु ६ ) एक सॅमसंग कंपनीचा व एक चायना कंपनीचा बंद असवस्थेत असलेले प्रत्येकी १०० रूप्रमाणे २०० रु . ( ७ ) दोन नग सोन्याचे डोरले वजन अंदाजे २ ग्रॅम कि.अं. ४,००० / - रु . असा एकुण १,६६,४०० / - रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Chandrapur police
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा प्रशांत शेंदरे, पोहवा पेतरस सिडाम, पोहवा मरकोल्हे, नापोशि विनोद यादव, नापोशि किशारे दैरागडे, नापोशि चिकाटे, नापोशि आनंद खरात, नापोशि निलेश मुडे, नापोशि पांडुरंग बाघमोडे, नापोशि / सतिश अवथरे, नापोशी लालु यादव, पोशि विकास नुमनाके, पोशी हिरालाल गुप्ता, पोशि संदिप कामडी, पोशि सुजीत शेंडे, मनापोशि / भावना रामटेके यांनी केली आहे.
