News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल - मूल शहरातील नागरिकांना अंतिम विसावा मिळावा यासाठी अंत्यविधी करिता उमा नदी काठावर लाखो रुपये खर्च करुन सुसज्ज अशी स्मशानभूमी बांधण्यात आली. याच स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मूलचे नागरिक प्रेत नेत असतात.
अशा दुःखद प्रसंगाच्या परिस्थितीत गेल्या काही दिवसापासून स्मशानभूमीतील अवाढव्य वाढलेल्या झाडांवर मधमाशांचे मोठं मोठे पोळे बसले असल्याने मृतात्म्याची अंत्यविधी करतांना मुखाग्नी दिल्यानंतर जो काड्याचा धूर निघतो त्याच धुराणी झाडावर असलेल्या मधाच्या पोळ्यावरील मधमाशा इतरत्र उडून सभोवताल अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्मशान भूमीत प्रेताचे अंत्यसंस्कार केल्यावर अग्नीच्या धुरामुळे उडून आलेल्या मधमाशा नागरिकांवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना नुकतीच दोन दिवसांपूर्वी घडली आहे. त्यामुळे नागरिकांना मधमाशापासून आपला जीव वाचवीन्यकारिता स्मशान भूमिला लागून असलेल्या नदीत उडी मारावी लागत आहे. नदीत पाणी खोल असल्याने जीव जाण्याची शक्यता नाकारता येत
नाही. ही वस्तुस्थिती असून याबाबतची कल्पना स्थानिक नगर परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे. Bee
स्मशानभूमीतील मधमाशामुळे मूल शहरातील नागरिक मधमाशांच्या दहशतीत असून अंत्यसंस्कारासाठी जायचे की नाही असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. मधमाशामुळे नागरिकांची जीवितहानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील. ही गंभीर बाब असून स्मशानभूमीतील झाडावर असलेल्या मधमाशांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन संजय गांधी निराधार योजना मूल चे अध्यक्ष, तथा मूल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष, काँग्रेस नेते राकेश रत्नावार यांनी नगरपरिषदेला दिले आहे. Mul cemetery
